महिलेच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक 

ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली महिलेच्या फसवणूक प्रकरणी (Police)एकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. गिरीश फडतरे असे त्याचे नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

तक्रारदार महिला या बोरिवली येथे राहतात. फेब्रुवारी महिन्यात त्या घरी होत्या. तेव्हा त्यांना एकाने पह्न केला. त्याने तो खासगी बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेला (Police)कर्जाविषयी माहिती सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. कर्जाची गरज असल्याने महिलेने त्यास होकार दिला. होकार दिल्यावर महिलेकडून कर्जाच्या नावाखाली त्याने पैसे घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

परिमंडळ-11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, उपनिरीक्षक मंगेश किरपेकर, रवी पाटील, जोपळे, इलग, राणे यांच्या पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीची रक्कम ज्या खात्यात जमा झाली होती, त्या खात्याची माहिती काढली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फडतरेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी फडतरेला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल, सिम कार्ड आणि डेबिट कार्ड जप्त केले आहे. फडतरेला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

रेल्वे प्रवाशांना विषबाधा, यशवंत-गोरखपूर एक्स्प्रेसमधील प्रकार; नेमकं काय घडलं?

घ्या हाती मशाल… देशाची वाट लावणाऱ्यांना, महाराष्ट्रातून रोजगार पळवणाऱ

विज्ञान-रंजन – सुएझ कालवा