बीड लोकसभा निवडणुकीत आता नवा ट्विस्ट(political marketing) पहायला मिळण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनादरम्यान बीडसह माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. त्या जाळपोळ प्रकरणात आरोप असलेले मराठा आंदोलन राजेंद्र होके आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बीडच्या माजलगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या पत्रकार परिषदेत होके पाटील यांनी भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार(political marketing) पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर पहिली तोफ डागली आहे. मराठा समाज कोणाचा गुलाम नाही तो स्वतंत्र निर्णय घेण्यास सक्षम आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे दोघांनीही काही केलं नाही.
समाज जिवंत ठेवायचा असेल तर आरक्षणच मिळायलाच हवं. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून, प्रसंगी जेलमध्ये जाऊन संघर्ष केलाय. काही पक्षांना वाटतंय मराठा समाज हा आमची मक्तेदारी आहे. आम्ही आरक्षणाच्या लढ्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवली आहेत. अंगावर केसेस घेतोय हे तुम्हाला आमदार, खासदार करण्यासाठी नाही, असं देखील होके पाटील यांनी म्हटलंय.
आज मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या होत असतील. कोणत्याही पक्षाने आपण समाजाचे कैवारी असल्याची नाटकं करू नयेत. शेतीच्या बांधावर जाऊन शेतकरी पुत्र म्हणू नका आधी मदत करा.
माझा आजोबा सांगायचा रेल्वे येतेय, आता मला माझ्या नातवाला सांगायची वेळ आली आहे, रेल्वे मग कधी येईल नेमकी रेल्वे कधी येणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे हा राजेंद्र होके उभा राहणार आणि निवडूनही येणार. आम्ही कधी जातिवाद केला नाही सर्व समाज माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे.
आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाऊ, तुमचे प्रश्न कोण सोडवतोय त्याचा विचार करून मतदान करा, बळी पडू नका, हा ओबीसीचा, हा मराठ्याचा आहे याचा विचार करू नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे. त्यामुळे होके यांच्या उमेदवारीने एक नवाच ट्विस्ट बीडच्या लोकसभा निवडणुकीत आल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :
PM झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच ‘RSS’च्या भूमीत मुक्कामी !
महाराष्ट्र हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर
जावयाच्या वाढदिवसानिमित्त हटके फोटो शेअर करत सुनील शेट्टी म्हणाला, “हे एक कनेक्शन आहे …”