कट्टर हिंदू कधीच बीफ खात नाही, कंगना रोखठोक बोलली; पोस्ट व्हायरल

अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे(beef) चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच. कंगना हिने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलं आहे. ‘कंगना हिला बीफ खायला आवडतं आणि भाजप पक्षाने तिला तिकिट दिलं आहे…’, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावर उत्तर देत कंगना हिने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे कंगना रनौत आणि बीफ वादाने डोकंवर काढलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या ट्विटची चर्चा रंगली आहे.

कंगना म्हणाली, ‘मी बीफ किंवा कोणत्याही(beef) प्रकारचं रेड मीट खात नाही. माझ्याबद्दल ज्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी अनेक दशकांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवनपद्धतीचा प्रचार करत आली आहे, आता अशा युक्त्या माझी प्रतिमा डागाळण्यासाठी काम करणार नाहीत.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी कशी हे माझ्या लोकांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे की, मी कट्टर हिंदू आहे आणि कोणी माझ्या लोकांची दिशाभूल करु शकत नाही… जय श्री राम…’ असं देखली अभिनेत्री म्हणाली. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्रीच्या एक्सवर ‘ट्विट’ जुना स्क्रिनशॉट शेअर करत नेटकऱ्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, 2019 मध्ये अभिनेत्रीने एक ट्विट केलं होतं. ते ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. ‘बीफ किंवा कोणत्या अन्य प्रकारचं मांस खाल्ल्याने काहीही होत नाही. ही धर्माची गोष्ट नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, कंगना रनौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचं निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. आता कंगना जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.

हेही वाचा :

नेत्यांच्या कोलांट्या उड्या आणि नियतीचा सूड……!

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास होणार कारवाई

मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका