नेत्यांच्या कोलांट्या उड्या आणि नियतीचा सूड……!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नियतीने उगवलेल्या राजकीय(revenge series) सूडाची कितीतरी जिवंत उदाहरणे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पहावयाला मिळतील,किंवा मिळतात. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्री हसन मुश्रीफ, माझी पालक मंत्री सतेज पाटील, मावळते खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजीत सिंह घाटगे आणि माजी खासदार श्रीमंत संभाजी राजे छत्रपती यांच्यासह अनेक जण सध्या नियतीने उगवलेल्या राजकीय सूडाला सामोरे जात आहेत. या सर्वांनी आपल्या राजकीय भूमिका, वैचारिक बैठका बदलल्या आहेत किंवा नियतीने त्या बदलण्यास भाग पाडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष यांच्यावर टीका(revenge series) केल्याशिवाय ज्यांचा दिवस सुरू होत नव्हता त्या हसन मुश्रीफ यांच्याकडून गेल्या वर्षापासून मोदी आणि भाजपवर स्तुती सुमनांची उधळण सुरू आहे. कागलच्या राजकारणात मुस्लिम यांचे संजय मंडलिक, समरजीत सिंह घाटगे यांच्याशी कधीच जमले नाही. संजय मंडलिक यांनी त्यांना कायम राजकीय शत्रू मानले तर समरजीत सिंह हे तर मुस्लिम केव्हा ईडीच्या कोठडीत जातात याच्या प्रतीक्षेत होते. आता हेच कालचे शत्रू आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केवळ एकत्र आले आहेत असे नव्हे तर व्यासपीठावर खुर्चीला खुर्ची लावून बसलेले दिसतात. या तिघांच्यावर नियतीने उगवलेला हा राजकीय सूड आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांच्या बाजूने आणि संजय मंडलिक यांच्या विरोधात होते. आज धनंजय महाडिक हे संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा दिसतात. गंमत अशी की माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस आघाडीच्या विरोधात जाऊन गेल्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या मागे आपली ताकद उभी केली होती.. आज तेच संजय मंडलिक यांचा पराभव करण्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींच्या मागे ताकतीनिशी उभा आहेत. त्यांचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्याशी चांगले संबंध होते असे कोणीही म्हणणार नाही पण सध्या ते एकत्र प्रचाराचा दिसू लागले आहेत.

संजय मंडलिक यांचे पिताश्री माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे सत्यशोधकी विचारांचे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे जातीयवादी पक्ष आहेत म्हणून ते सातत्याने टीका करायचे. आता संजय मंडलिक हे शिवसेना, भाजप यांच्याशिवाय या देशाचा विकास अशक्य असल्याचे सांगत फिरत आहेत. शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिल्यांदा ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची माफी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी काम करणार नाही असा त्यांना विश्वास द्यावा लागला.

हसन मुश्रीफ यांना कोणत्याही क्षणी ईडी कडून अटक होण्याची शक्यता असताना त्यांनी थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. पालकमंत्री झाल्यानंतर भाजपच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकास कामात आम्हालाही विश्वासात घ्या अशी विनंती केली. हसन‌ मुश्रीफ हे आज संजय मंडलिक यांचे स्टार प्रचारक आहेत. कागल मुरगुड च्या जनतेने संजय मंडलिक यांना भरघोस मते देऊन त्यांचा सन्मान करावा असे त्यांना आवाहन करावे लागते आहे. गेल्या निवडणुकीत याच हसन मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना का मते देऊ नयेत याची एक यादीच भाषणातून वाचून दाखवण्याचा सुरुवात केली होती.

संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेशक केल्यावर त्यांचे पहिले स्वागत धनंजय महाडिक यांनी केले होते. जिल्ह्याच्या राजकारणात आता आम्ही एकत्र असणार आहोत असे जाहीर करून संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचा अपकाराने पैरा फेडला होता. सदाशिवराव मंडलिक हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. आता याच शरद पवारांना संजय मंडलिक हे कपट कारस्थानी वाटतात. श्रीमंत शाहू छत्रपतींना लोकसभा निवडणुकीत उतरवाने हे शरद पवार यांचे षडयंत्र असल्याचे ते म्हणत आहेत. षडयंत्र हा शब्द कशा अर्थाने वापरला जातो हे त्यांना माहीत नसावे.

खासदार धैर्यशील माने यांचे आजोबा बाळासाहेब माने हे शिवसेना भाजपाचे कट्टर विरोधक होते. आजोबांच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन धैर्यशील माने हे शिवसेना , भाजपकडे वळलेले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील विकास कामांचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना किती यातायात करावी लागली हे इथल्या सर्वसामान्य जनतेने पाहिलेले आहे. त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कडून तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडून विरोध झालेला होता. आता याच नाराज कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागून त्यांची समजूत घालून माझ्यासाठी प्रचारात सक्रिय रहा असे त्यांना सांगावे लागत आहे. एकूणच यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांना जसा काव्यगत न्याय मिळाला आहे तसेच नियतीने उगवलेल्या राजकीय सूडाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा :

इलॉन मस्क पुन्हा गोत्यात! कोर्टाचे आदेश मानण्यास नकार

मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास होणार कारवाई