ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर, कारने तिघांना चिरडले

मुंबईमध्ये भीषण कार अपघाताची घटना समोर आली आहे. कारने ३ जणांना चिरडले(accelerator). यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. कांदिवलीमध्ये ही घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर(accelerator) दाबले त्यामुळे हा अपघात झाला. कारचालकाने तिघांना चिरडले. कांदिवलीच्या पोयसर परिसरातच हा अपघात झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. २१ जूनला अपघाताची ही घटना घडली होती.

कांदिवलीच्या माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा अपघात झाला होता. कांदिवली परिसरात राहणारे टॅक्सी चालक राजेंद्र गुप्ता हे मित्र सुरेंद्र गुप्ताला शुक्रवारी कार चालवण्यास शिकवत होते. सुरेंद्रकडे कार चालवण्यासाठीचा परवाना नव्हता. तरी देखील तो विनापरवाना कार चालवण्यास शिकत होता. यावेळी सुरेंद्रने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले. त्यामुळे कार वेगाने पुढे गेली आणि कारने तिघांना चिरडले. जोरात धडक बसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणे कार चालवल्याप्रकरणी कारमालक सुरेंद्र गुप्ता आणि चालक राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

हेही वाचा :

आंघोळीच्या वादातून 2 जणांची हत्या झाली, नेमकं काय घडलं?

रक्तरंजित रविवार! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

देवसेनाला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार, मध्येच रडता रडता हसतेय