लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचाराचा(land) नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथून फोडणार आहेत. त्यांची 19 एप्रिलला सभा होणार असून, यानिमित्त ते नागपूरला मुक्काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचा ऑरेंज सिटी, संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात पहिल्यांदाच मुक्काम पाहता पोलिस बंदोबस्त वाढविल्याची माहिती समोर येत आहे.
नागपूरमध्ये उद्या 19 एप्रिल रोजी मतदान(land) होत आहे. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात येणार आहेत. त्यांची 19 एप्रिलला वर्धा येथे सभा होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी एक दिवसाचा मुक्काम नागपूर येथे करणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून ते पहिल्यांदाच नागपूर येथे मुक्कामी थांबणार आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. भाजपचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे, तर रामटेक येथेही त्यांची सभा झाली आहे. यानंतर राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरला येणार आहेत. त्यांची वर्धा येथे 19 एप्रिलला सभा होणार आहे.
नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपकडून उभे आहेत. तर वर्धा येथून विद्यमान खासदार रामदास तडस हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 एप्रिल रोजी देखील सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांची 19 एप्रिल रोजी वर्धा येथे जाहीर सभा होणार आहे. वर्धा येथे रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मोदी येणार आहे. त्यानंतर ते नागपूरला मुक्कामी थांबण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 एप्रिल रोजी परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे होणाऱ्या सभांना संबोधित करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या 10 दिवसांत मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा असेल. त्यांनी सर्वप्रथम चंद्रपूर येथे सभेला संबोधित केले होते. त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात त्यांची सभा झाली. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजू पारवे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.
पश्चिम विदर्भात मोदींची सभा नसल्याने या मतदारसंघाच्या विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. घराणेशाहीचा आरोप भाजपवर झालेल्या अकोल्यात मोदींनी सभा नाकरल्याची माहिती असून, या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर लोकसभेत याराना सेफ ..!
महाराष्ट्र हादरलं! आजोबाकडून नातीवर अत्याचार, मुलगी ९ महिन्यांची गरोदर
जावयाच्या वाढदिवसानिमित्त हटके फोटो शेअर करत सुनील शेट्टी म्हणाला, “हे एक कनेक्शन आहे …”