जिओ अन् एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका

नवी दिल्लीः आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना(recharge plan) आणखी एक मोठा झटका बसला. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनंतर वोडाफोन आयडियाने ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले आहेत. पोस्टपेड आणि प्री-पेड दोन्ही ग्राहकांसाठी कंपनीने शुक्रवारी नवीन प्लॅनची घोषणा केली आहे. येत्या ४ जुलैपासून हे नवीन रिचार्ज प्लॅन लागू होणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वोडाफोन-आयडिया(recharge plan) कंपनीने मोबाईल रिचार्ज प्लॅन्स १० ते २१ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना रिचार्जसाठी आता जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, २८ दिवसांसाठी ग्राहकांना आधी १७९ रुपये खर्च करावे लागत होते.

आता हाच रिचार्ज प्लॅन आता १९९ रुपयांना झाला आहे. तर ४५९ रुपयांचा ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन ५०९ रुपयांना झाला आहे. याशिवाय ३६५ दिवसांसाठीचा प्लान आधी १७९९ रुपयांना मिळत होता. तो तब्बल २०० रुपयांनी वाढून १९९९ रुपये इतका झाला आहे.

दुसरीकडे २६९ ​​आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची देखील किंमत वाढली आहे. यापुढे २६९ रुपयांचा प्लॅन २९९ रुपयांना मिळणार आहे. तर २९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किमत ५० रुपयांनी वाढून ३४९ रुपये इतकी झाली आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा रिचार्ज प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे.

डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपये आणि ३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आता ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता अनुक्रमे १ आणि ३ दिवसांची आहे. वोडाफोन-आयडियाने सांगितलं की, ४ जीबी डेटाची सेवा उत्तम देण्याबरोबरच ५ जीबी डेटा सेवा देण्यासाठी पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या गुंतवणुकची योजना कंपनी करत आहे. एन्ट्री लेव्हल युजर्सना लक्षात घेऊन प्लॅनमध्ये किरकोळ वाढ केल्याचं कंपनीने स्पष्ट केलं.

हेही वाचा :

निसर्गाचा कोप : ढगफुटी म्हणजे काय आणि ती कशी घडते?

समृद्धी महामार्गावर दोन कारची भीषण धडक, 6 ठार

महाराष्ट्र विधानसभेत ‘माऊली’ योजनांची घोषणा: वारकरी, कष्टकरी, आणि शेतकरींसाठी अत्याधुनिक सुविधा आणि निधी