T20 WC विजयानंतर आता कुलदीप यादवची लगीन घाई?

टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादवने T20 WC विजयानंतर आता लवकरच आनंदाची बातमी(cricket) मिळणार आहे असं वक्तव्य केलं. T20 World Cup फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताच्या विजयात कुलदीप यादवचाही मोलाचा वाटा आहे. मुंबईत आल्यानंतर टीम इंडियाचं मोठ्या थाट्यामाट्यात सेलिब्रेशन झालं. त्यानंतर कुलदीप घरी कानपूरला गेल्यावर कुटुंबियांसोबत चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

यावेळी कुलदीपने चाहत्यांना आनंदाची बातमी(cricket) मिळणार आहे असं सांगितलं. एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखत त्याने लग्नाबद्दल सांगितलंय. अनेक क्रिकेटर्सने बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केलंय. त्यामुळे कुलदीप कोणाशी लग्न करणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याबद्दल खुद्द कुलदीपने खुलासा केलाय. तो म्हणाला की, ‘तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे पण मी अभिनेत्री लग्न करणार नाही. तर ती माझी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकले.’

कुलदीप म्हणाला, ‘आम्ही खूप आनंदी आहोत. याची आम्ही बराच वेळ वाट पाहत होतो. आपल्या लोकांना इथे पाहून खूप छान वाटतंय. हे आपल्यासाठी नाही तर आपल्या भारतासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. भारताने 17 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कप जिंकलाय. 2007 मध्ये, भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या फॉरमॅटची स्पर्धा जिंकली.’

टीम इंडियाला 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात मदत करण्यात कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावलीय. स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये तो संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. अमेरिकेत खेळल्या गेलेल्या गट टप्प्यातील सामन्यांमध्ये कुलदीपला बाहेर बसावं लागलं होतं, जेथे खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचा अधिक पाठिंबा होता. ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं.

त्यानंतर सुपर-8 सामने, सेमीफायनल आणि फायनलमध्ये सिराजच्या जागी कुलदीप यादवचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाला. ग्रुप स्टेजनंतर उर्वरित सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले गेले, जिथे कुलदीपने 5 सामन्यात 10 विकेट घेऊन उत्तम कामगिरीच प्रदर्शन केलं.

कुलदीपने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत 12 कसोटी, 103 वनडे आणि 40 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तो खेळला आहे. तर कसोटीत 53, एकदिवसीय सामन्यात 168 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 69 विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा :

झटपट नाश्त्यासाठी ‘मसाला मखाना’, ही आहे सोपी रेसिपी

सुसाट कारचालकाने दोन पोलिसांना उडविले; आरोपी घटनास्थळावरून पसारानंतर प्रकरणात वेगळे अवस्थान

मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे पोलीस भरती प्रक्रिया स्थगित