राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून महायुतीमधील अजित पवार(political news todays) गटामध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. यामुळे पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये अनेकांनी नाराजी जाहीर केली.
तसेच, दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्याने मानकरांच्या समर्थकांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत. तब्बल 600 राजीनामे देण्यात आले आहेत. आता यामध्ये आणखी काही नेत्यांची भर पडली आहे. पक्षाच्या विविध पदांवरुन राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता 850 वर पोहोचली आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत हे राजीनामा सत्र सुरू असल्याचं दिसून येतंय.
दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना(political news todays) अपेक्षा होती.मात्र, त्यांना इथे संधी देण्यात आली नाही. त्यामुळे मानकर यांच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला होता. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी 250 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम मी केले असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच, रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर संधी देण्यात आल्याने देखील त्यांनी नाराजी जाहीर केली.
अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी देखील चाकणकर यांना संधी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही महिला नेत्यांमध्ये यावरून चांगलीच जुंपली. यामुळे अजित पवार यांची राजीनामा सत्र आणि नाराजी यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.आज (18 ऑक्टोबर) दीपक मानकर आणि रुपाली ठोंबरे अजित पवारांची पक्ष कार्यालयात भेट घेत आहेत. आता त्यांच्यात नेमकी काय चर्चा होते, त्यावर सर्वांचं लक्ष राहील. तसेच, यावर पक्षाकडून काय मार्ग काढण्यात येणार, याकडेही सर्वांच्या नजरा असतील.
‘या’ नेत्यांनी घेतली आमदारकीची शपथ
चित्रा वाघ (भाजपा)
विक्रांत पाटील (भाजपा)
बाबू सिंग महाराज राठोड (भाजपा)
पंकज भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार)
माजी महापौर इद्रिस नायकवडी (राष्ट्रवादी अजित पवार)
माजी खासदार हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)
मनीषा कायंदे (शिवसेना शिंदे गट)
हेही वाचा:
अरमान मलिकचा भीषण अपघात, थोडक्यात बचावला
हरवलेले मांजर शोधून देण्याच्या बदल्यात शारीरीक सुखाची मागणी; धक्कादायक प्रकार
अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका