महायुती विधानसभे साठी अजित पवार गटाला मदत करणार नाही

माढा लोकसभा (parliament) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम केले नाही, त्यामुळे अजित पवार गट भविष्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीत असेल तर आम्ही त्यांना मदत करणार नाही, असा इशारा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाची फलटणमध्ये सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीत माढा लोकसभा (parliament) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाचे विश्लेषण करण्यात आली. त्यात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर यांना कोणतेही सहकार्य केले नाही, अशी तक्रार निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केली होती. त्यावर बोलताना भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट भविष्यात महायुतीमध्ये असेल तर आम्ही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जाणार नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

लोकसभा (parliament) निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी भाजपशी गद्दारी केली, त्या लोकांना पक्ष स्तरावर आणि शासन स्तरावर कसल्याही परिस्थितीमध्ये राजकीय मदत झाली नाही पाहिजे. त्यांना कुठली पद दिली जाऊ नयेत, अशी मागणी फलटणच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी केली. या सगळ्या मागणींचा विचार करून त्या सर्व मागण्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहोत, असे कदम यांनी सांगितले.

कदम म्हणाले, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीसुद्धा भाजपाच्या विरोधात काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ती मागणी आम्ही वरिष्ठांपर्यंत पोचवली आहे, त्याच्यावर भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं आहे. ते लोक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विधानसभेला उभे राहिले, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना मदत करण्याच्या मूडमध्ये नाहीत, असं कालच्या बैठकीतून स्पष्टपणे दिसून आलं आहे. संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे जिथं जिथं मतदासंघ आहेत, त्यांनी विरोधात काम केलं, असा सूर कालच्या बैठकीत होता, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

अमेठीतील पराभवानंतर स्मृती इराणी पुन्हा गांधींना नडणार?

राजीनामा देताना वर्षा गायकवाड यांच्या भावना दाटल्या

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची शक्ती एकवटली! घोषणांनी परिसर दणाणला….