लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के यशासाठी अजित पवार यांची सर्वात मोठी रणनीती

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांचे(strategy) जागा वाटप निश्चित झालेले नाही. आठ जागांवर अजून एकमत होऊ शकले नाही. त्यात मुंबईतील दक्षिण मुंबईसह तीन जागा आणि ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा आहेत. परंतु या सर्व जागा भाजप किंवा शिवसेनेच्या आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागा लढवणार आहे. या पाचही जागांवर विजय मिळवण्यासाठी अजित पवार यांनी मेगा प्लॅन तयार केला आहे. या रणनीतीनंतर शंभर टक्के विजय मिळण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून(strategy) रायगड, परभणी, बारामती, शिरूर, धाराशिव या पाच जागांवर उमेदवार जाहीर झाले आहे. या पाचही जागा निवडून आणण्याची रणनीती पक्षात तयार झाली आहे. त्यासाठी या ५ लोकसभा मतदार संघामध्ये उर्वरित ४२ लोकसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते हे या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहेत. कार्यकर्त्यांची ही फौज राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयापर्यंत नेणार आहे. प्रत्येक वार्ड आणि प्रत्येक घरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहचणार आहेत.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभरातील लोकसभेच्या ५ जागांवर निवडणूक लढवत आहेत. यामुळे ४२ मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांवर या ठिकाणांची जबाबदारी दिली आहे. तसेच ४२ मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आहेत. या पाच लढतींमध्ये सर्वाधिक लक्ष बारामतीकडे असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात आहे. यामुळे देशभरातील राजकीय निरीक्षकांचेही या लढतीकडे लक्ष लागले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. आता उमेदवारी भरण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी राहिले आहेत. सुट्यांमुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ चार दिवस आहे. १२ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यत उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा कालावधी आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीत तीन दिवस सुट्या येत आहेत. या ठिकाणी ७ मे रोजी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उद्या विनायक राऊत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा :

Resume असा बनवा की कंपनीने फोन करून बोलावलं पाहिजे!

धोनीच्या फटेबाजीनंतर गावसकर Live मॅचमध्ये पंड्यावर बरसले! 

रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलसाठी भरती; असा करा अर्ज