रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलसाठी भरती; असा करा अर्ज

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ने कॉन्स्टेबल(police constable) आणि SI च्या 4660 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला उद्यापासून म्हणजेच १५ एप्रिलपासून अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ मे निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये कॉन्स्टेबलच्या 4208 आणि सब इन्स्पेक्टर च्या 452 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रेल्वे पोलीस(police constable) दलात सामील होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार आरपीएफच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवार rpf.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 मे 2024 निश्चित करण्यात आलीय. या भरतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता आणि निकषांबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे.

RPF कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी/मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उपनिरीक्षक (SI) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षे असावे. याचप्रकारे उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे २० ते २८ वर्षापर्यंत असावे. तर राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. 1 जुलै 2024 ही तारीख लक्षात घेऊन वयाची गणना केली जाईल.

या भरतीसाठी अर्जाची लिंक उद्या अधिकृत वेबसाइट rpf.indianrailways.gov.in वर सक्रिय होईल. यानंतर तुम्हाला पहिल्या नोंदणी लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर उमेदवार लॉग इन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतील. या भरतीच्या अर्जासोबत उमेदवाराला निर्धारित शुल्क जमा करावा लागणार आहे. सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 500 रुपये भरावे लागतील. SC/ST/PH आणि महिला उमेदवारांना 250 रुपये भरावे लागतील.

हेही वाचा :

 ‘मुस्लिम मते हवीत पण उमेदवार नको’, प्रकाश आंबेडकरांचा ‘मविआ’वर निशाणा

जिओ सिनेमावर मोफत आयपीएल दाखवून मुकेश अंबानींनी केली 4000 कोटींची कमाई

शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश