Resume असा बनवा की कंपनीने फोन करून बोलावलं पाहिजे!

शिक्षण पूर्ण झालं की तरूण मुलं नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. शिक्षण आणि नोकरी यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा असतो तो आपला(resume)रेझ्युमे. कारण, तुम्ही स्वत:हून सांगण्याआधीच तुमचे शिक्षण, स्कील्स आणि सगळी डिटेल माहिती हा रेझ्युमे कंपनीतील अधिकाऱ्यांना सांगतो.

नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी आमचे पहिले प्राधान्य म्हणजे रेझ्युमे तयार करणे. एक चांगला रेझ्युमे मुलाखतकारावर चांगली छाप पाडतो, म्हणून आज आम्ही तुम्हाला एक चांगला आणि प्रभावी(resume) रेझ्युमे कसा बनवायचा याबद्दल माहिती देणार आहोत.

आपण या पोस्टमध्ये मोबाइलवरून बायोडाटा कसा बनवायचा आणि नोकरीसाठी बायोडाटा कसा बनवायचा, तसेच ऑनलाइन रेझ्युमे बनवण्यासाठी सर्वोत्तम वेबसाइट आणि ॲप्स कोणती आहेत याबद्दल माहिती दिली जाईल.

My Resume/CV Builder

My Resume/CV Builder ॲप वापरण्यास सर्वात सोपे आहे. हे ॲप रेझ्युमे तयार करताना मूलभूत माहिती विचारते. माहिती एंटर केल्यानंतर तुम्ही ज्या फॉरमॅटमध्ये रिझ्युम सबमिट करू इच्छिता ते सिलेक्ट करू शकता.

पण यात एक अडचण अशी आहे की ती पुन्हा सुरू होईपर्यंत त्याचा प्रिव्ह्यूव पाहता येत नाही. ॲप स्वयंचलितपणे तयार केलेला रेझ्युमे पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करतो. तसेच, तुम्हाला यात जुने रेझ्यूमे Edit करून देतो.

My Resume

My Resume App मध्ये तुम्हाला मूलभूत माहिती टाकावी लागेल. या ॲपमध्ये फॉन्ट प्रकार, कलर, आकार आणि अशा गोष्टी सिलेक्ट करता येतात. यानंतर तुमचा गरजेनुसार रेझ्युमे सेव्ह केला जातो. तुम्ही तुमच्या रेझ्युमेसाठी टेम्पलेट किंवा फॉरमॅट देखील निवडू शकता. पूर्ण रेझ्यूमे झाल्यानंतरच तो कसा दिसेल हे पाहता येते.

Super Resume Pro

हे रेझ्युमे मेकर ॲप वापरकर्त्यांना मूलभूत माहिती विचारण्यापूर्वीच टेम्पलेट लेआउट निवडू देते. तसेच, हे ॲप युजर्स त्यांच्या जॉब प्रोफाइलच्या आधारावर कोणत्या प्रकारचे रेझ्युमे लेआउट निवडावे हे देखील सुचवते. हे एक अतिशय उपयुक्त फिचर आहे. आवश्यक माहिती केल्यानंतर युजरचा बायोडेटा तयार केला जातो. हे ॲप बरेच चांगले आहे.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा

जिओ सिनेमावर मोफत आयपीएल दाखवून मुकेश अंबानींनी केली 4000 कोटींची कमाई

 ‘मुस्लिम मते हवीत पण उमेदवार नको’, प्रकाश आंबेडकरांचा ‘मविआ’वर निशाणा