बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विविध राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या विषयावर आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या (resignation)राजीनाम्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना या विषयावर प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल(resignation) विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता न्यायाची प्रक्रिया महत्त्वाची आहे.”
अजित पवार पुढे म्हणाले, “या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे. तीन विविध एजन्सी या प्रकरणाचा तपास करत आहेत. जो कोणी दोषी असेल आणि हे चौकशीत सिद्ध झालं तर कारवाई नक्कीच होईल. मात्र पुरावा नसताना कोणावर आरोप करणं योग्य नाही.”
आमदार सुरेश धस यांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर आरोप होत असले तरी अजित पवारांनी आरोपांबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतं.
मस्साजोग गावातील या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर पुढे काय निर्णय होईल, तसेच न्यायालयीन चौकशीतून सत्य बाहेर येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचा :
तीन वेळा डोकं भिंतीवर आपटलं, नंतर गळा दाबला खून करुन मृतदेह बाथरुममध्ये लपवला अन्…
‘आशिकी २’ची जादू परतणार! श्रद्धा आणि आदित्य पुन्हा रोमँटिक जोडीच्या भूमिकेत!
संजय दत्तच्या आयुष्यातील चौथ्या लग्नाची चर्चा, ‘या’ अभिनेत्रीचं नाव ऐकून थक्क व्हाल!