अमोल आता डायरेक्ट खासदार होणार; गजानन कीर्तिकर यांचे वक्तव्य

अमोलला बोट धरून मी शिवसेनेत आणले. आता अमोल ना नगरसेवक, ना आमदार, तर डायरेक्ट खासदार होणार असे विधान शिंदे गटाचे खासदार गजाजन कीर्तिकर यांनी केले. इतकेच नव्हे तर, महाविकास आघाडीला महाराष्ट्रात(mh) चांगल्या जागा मिळतील असेही त्यांनी सांगितले.

एका खासगी टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात बोलताना गजानन कीर्तिकर यांनी हे विधान केले. यापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदे गटात प्रवेश केला त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते. पण मी निर्णय घेतला आणि एकटा पडलो. आज टार्ंनग पॉईंटला मी मुलासोबत नव्हतो. त्यानंतर आता गजानन कीर्तिकर यांनी अमोल थेट खासदार होणार असे वक्तव्य केले आहे.(mh)

z अमोल हा उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही. त्याला जायचे असते तर त्याचवेळी आमच्यासोबत शिंदे गटात आला असता. एकनाथ शिंदे यांनी त्याला स्वतःसोबत आणायला सांगितले होते; पण त्याने आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे जिंकल्यानंतरही तो उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे कीर्तिकर म्हणाले.

महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार

राज्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिले आहेत ते पाहिल्यावर महाविकास आघाडीला राज्यात चांगल्या जागा मिळतील, असे कीर्तिकर म्हणाले.

हेही वाचा :

महंगाई डायन… ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत

गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून कोल्हापुरात…

12वी नंतर पुढे काय करायचं? वाचा करिअरच्या संधी