सांगलीमध्ये संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर(candidate) निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली असा उद्धव ठाकरेंचा यशस्वी दौरा पार पडला आहे. चंद्रहार पाटलांसाठी भव्य सभा पार पडली. या सभेत कॉंग्रेस नेते व्यासपीठावर होते. कालची सभा सकारात्मक झाली. तिरंगी लढत होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तिरंगी लढत करण्यामागे कुणाचे डावपेच, हे नंतर कळेल. सांगलीत एक भाजपचा अधिकृत उमेदवार(candidate) , एक अनधिकृत उमेदवार आहे. त्यासाठी नेत्यांचा फौंजफाटा सांगलीत येतोय, अशी टीका त्यांनी केली आहे. सांगलीच्या जागेबाबतचे शरद पवार यांचं वक्तव्य नाराजीतून आहे, असं वाटत नसल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
मोदींनी खिडकी काय, दरवाजा उघडला तरी काही फरक पडणार नाही. नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळत नाही, त्यामुळे मोदी असे वक्तव्य करत आहेत. आम्ही मोदी यांच्या सोबत कदापी जाणार नाही. मोदी खोटे बोलतात. महाराष्ट्रात मोदी फाईल बंद झाली आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. भाजपचे दोन उमेदवार असल्याने दुसऱ्या उमेदवारासाठी काही प्रचारक नेमले असतील. राऊतांनी विशाल पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना टोला लगावला आहे.
सांगलीबाबत राहुल गांधी यांच्याशी बोलणं झाल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईबाबत बोलल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. मोदी, शाह, अडचणीत असल्यामुळे असे वक्तव्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर ठाकरेंबद्दल प्रेम असते, तर मोदींनी शिवसेना बेईमान माणसाकडे दिली नसती, अशी टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा :
सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..
कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार; पत्नीने बनवला व्हिडिओ अन्..
मोदींचाच आत्मा वखवखलेला; शरद पवारांवरील पंतप्रधानांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार