महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा(tax act) हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाज माध्यमांवर त्यांचा भलामोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी याच माध्यमावर देशातील पहिल्या हवाई टॅक्सीची झलक दाखवली आहे. त्यांनी ही दळणवळणाच्या जगतातील क्रांती म्हटली आहे. आनंद महिंद्रा यांनी या फ्लाईंग कारच्या फीचर्स पण माहिती शेअर केली आहे. ही कार पुढील वर्षी देशात लाँच होऊ शकते,अशी शक्यता पण त्यांनी वर्तवली आहे.
या फ्लाईंग कारचा फोटो आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. ही फ्लाईंग टॅक्सी(tax act) एकावेळी 200 किलो वजन वाहून नेऊ शकते. तर ती 200 किलोमीटरचे अंतर कापू शकते. आनंद महिंद्रा यांनी या इलेक्ट्रिक फ्लाईंग कारचा फोटो पण शेअर केला आहे. जाणून घ्या त्यांनी काय अधिक माहिती शेअर केली ते…
देशातील पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरुन या हवाई टॅक्सीचा फोटो शेअर केला आहे. IIT Madras यांनी देशाची पहिली इलेक्ट्रिक टॅक्सी तयार करण्यासाठी ईप्लेन कंपनी स्थापन केली आहे. ही इलेक्ट्रिक फ्लाईंग कार पुढील वर्षांपर्यंत आकाशात भरारी घेण्याचा विश्वास त्यांना वाटत आहे.
आयआयटी मद्रास हे जगातील रोमांचक आणि सक्रिय इनक्युबेटर असल्याची कौतुकाचा थाप त्यांनी दिली. तर देशात अशा संस्था उदयास येत असल्याने नवनवीन तंत्रज्ञान, अविष्कार येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आयआयटी मद्रासने तयार करण्यात येत असलेल्या इलेक्ट्रिक फ्लाईंग टॅक्सीच्या फीचर्सची माहिती दिली.
The eplane company.
— anand mahindra (@anandmahindra) May 10, 2024
A company being incubated at IIT Madras to build a flying electric taxi by sometime next year…
IIT Madras has become one of the WORLD’s most exciting and active incubators.
Thanks to them and the rapidly growing number of ambitious incubators throughout… pic.twitter.com/Ijb9Rd2MAH
जगातील नवीनता
हवाई टॅक्सी हा जगातील नवीन शोध असल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले. त्यांनी देशातील पहिल्या हवाई टॅक्सीचा फोटो ट्वीट केला. तसेच या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयआयटी मद्रासचे कौतुक केले. त्यांनी हे भविष्यातील वाहन असल्याचे सांगितले.पुढील वर्षात कदाचिती भारतात दळणवळणाचं नवीन साधन उपलब्ध असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही हवाई टॅक्सी ईप्लेन कंपनी आयआयटी मद्राससह तयार करत आहे. ईप्लेन ही कंपनी चेन्नईतील स्टार्टअप आहे. या कंपनीला गेल्यावर्षी डायरेक्टर ऑफ सिव्हिल एविएशनने इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट तयार करण्यासाठी मंजूरी दिली होती. ईप्लेन कंपनीने या एअर टॅक्सीला ई200 नाव दिले आहे. एकदा चार्ज केल्यावर ही हवाई टॅक्सी 200 किलोमीटर हवाई अंतर कापेल.
हेही वाचा :
ह्रदयद्रावक! उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन
चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?