… अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली

हारबॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक रणजीत यांनी 80, 90 चा काळ(crying) गाजवला होता. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत असताना रणजीत खलनायकांच्या यादीत टॉपमध्ये होते. या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील काही किस्से सांगितले आहेत. यातील एक किस्सा त्यांनी सांगितला जेव्हा माधुरी दीक्षित ढसाढसा रडली होती. ‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान आपल्यासह विनयभंगाचा सीन शटू करण्यास माधुरी दीक्षितने नकार दिला होता असं रणजीत यांनी सांगितलं आहे.

रणजीत यांनी हा किस्सा उलगडताना(crying) सांगितलं की, “माधुरी दीक्षित रडू लागली आणि सीन करण्यास नकार दिला. मला नेमकं काय झालं याची कल्पना नव्हती. एका आर्ट डायरेक्टरने मला याबद्दल सांगितलं. तो आर्ट डायरेक्टर बंगाली होता. आमचे दिग्दर्शक बापू होते. ते दक्षिणेकडील होते. आम्ही सेटवर फार मजा करायचो. मी सहकलाकरांना सांगायचो की, डार्लिंग तोंड थोडं तिकडे कर मी कपडे बदलून घेतो. मी तर मेकअप रुममध्येही जायचो नाही. हे सर्व तेव्हा सामान्य होतं. मला लोकांनी तसंच स्विकारलं होतं. अन्यथा त्यांनी मी खोटारडा आहे असं म्हटलं असतं”.

रणजीत यांनी यावेळी आपण विनयभंगासारखे सीन करण्यासाठी कधीही जबरदस्ती केली नसल्याचं सांगत, फार प्रोफेशनल असल्याचं स्पष्ट केलं. “माधुरीचं रडणं सुरुच होतं. मला दुसऱ्या शूटला जायचं होतं. मी तिला फोन करण्यास सांगितलं. मला कोणीही ती सीन शूट करण्यास तयार नसल्याचं सांगत नव्हतं.

अखेर ती तयार झाली. वीरु देवगन तेव्हा फाईट मास्टर होते. त्यांनी कॅमेरा सतत रोल होईल असं स्पष्ट केलं होतं. कॅमेरा मधेमधे बंद होता कामा नये असं त्यांनी सांगितलं होतं. विनयभंग हा कामाचा भाग आहे. खलनायक वाईट व्यक्ती नाही. मी कधीही जबरदस्ती केली नाही, म्हणून माझ्या सर्व अभिनेत्रींना मी आवडायचो,” असं रणजीत यांनी सांगितलं.

‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात माधुरी दीक्षितसह मिथुन चक्रवर्ती, सतीश कौशिक, विनोद मेहरा प्रमुख भूमिकेत होते.

हेही वाचा :

गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा

मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तय्यार ? एअरटेल एक्स्ट्रीम फायबरसोबत मिळेल शानदार एंटरटेनमेंट