हार्दिकला हेच हवं होतं की…; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सिझनमध्ये अखेर मुंबई इंडियन्सच्या(win money) पारड्यात विजयाचं सुख पडलं. दिल्ली विरूद्ध मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या टीमला पहिला विजय नोंदवता आला आहे. या सामन्यात वानखेडेच्या मैदानावर मुंबईने इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 रन्सने पराभव केला. या सामन्यानंतर मुंबईच्या टीममधील प्रत्येक खेळाडू खूश असल्याचं दिसून आलं. दरम्यान यावेळी ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माने हार्दिक पंड्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माच्या जागी नवा कर्णधार हार्दिक पंड्या(win money) यंदाच्या सिझनमध्ये मुंबईच्या टीमची धुरा सांभाळतोय. मात्र या लीगची सुरुवात मुंबईच्या टीमसाठी काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. यावेळी मुंबईच्या टीमला पहिले 3 सामने गमवावे लागले होते. यानंतर चौथ्या सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. या विजयानंतर रोहित शर्माला ड्रेसिंग रूममध्ये खास अवॉर्ड देण्यात आला.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहितने 29 बॉल्समध्ये 49 रन्सची तुफान खेळी केली. यासाठी मुंबई इंडियन्सचे कोच मार्क बाउचर यांनी रोहितला खास अवॉर्ड दिला. दरम्यान हा अवॉर्ड मिळाल्यानंतर रोहितने कर्णधार हार्दिक पांड्याला अशीच कामगिरी हवी आहे, असं स्पष्ट केलं.

रोहितला अवॉर्ड देताना बाऊचर म्हणाले, रोहित हा खास अवॉर्ड मी तुला देणार आहे. कारण तू बॅटिंग लाईन अपमध्ये सर्वात सिनीयर खेळाडू आहे. दरम्यान बाऊचरटचे हे शब्द ऐकताच रोहित शर्मा थोडा आश्चर्यचकित झाला होता. मात्र अवॉर्ड मिळणार हे कळताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. यानंतर मुंबईच्या टीमचा बॅटींग कोच किरण पोलार्डने हा बॅच रोहितच्या जर्सीवर लगावला.

पहिल्या विजयानंतर अवॉर्ड मिळताच रोहित शर्मा म्हणाला, मला असं वाटतं की, ही फलंदाजीतील माझी उत्कृष्ट कामगिरी आहे. पहिल्याच सामन्यापासून आम्ही यासाठी प्रयत्न करत होतो. संपूर्ण फलंदाजी टीमने एकत्र येऊन कामगिरी केली तर वैयक्तिक कामगिरीत फरक पडत नाही, हे या गोष्टीवरून दिसून येतं. जर आपण टीमचे लक्ष्य पाहिलं तर आपण ते अशा प्रकारच्या स्कोरने नक्की ते गाठू शकतो.

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, माझी ही कामगिरी काहीशी अशी आहे, ज्याविषयी गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा होत होती. बॅटिंग कोच, मार्क बाऊचर आणि कर्णधार हार्दिक पंड्याची देखील हीच इच्छा होती. त्यामुळे ही खेळी काही प्रमाणात तशीच झाली. ही कामगिरी अशीच सुरु राहिली पाहिजे, जसं तुम्ही म्हणताय.

हेही वाचा :

… अन् माधुरी दीक्षित सेटवरच ढसाढसा रडू लागली

गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा