पक्षापेक्षा नेते झाले मोठे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : संध्याकाळ झाली की, सूर्याच्या मावळत्या किरणामुळे(leadership coaching) छोट्या माणसाची सावली मोठी होते. अगदी तसाच प्रकार राजकारणात ही सध्या दिसू लागला आहे. महाराष्ट्रात तर हे अतिच झाले आहे. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेला आहे की, पक्षापेक्षा मी मोठा अशा मानसिकतेत आलेल्यांनी पक्ष नावाची लोकशाहीमध्ये एक व्यवस्था असते यालाच छेद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. संजय राऊत, संजय शिरसाट, नितेश राणे यांना त्यांच्या पक्ष नेतृत्वाने सर्व अधिकार दिले असल्यासारखे ते बोलत असतात. विशेषतः संजय राऊत हे पक्ष नेतृत्वापेक्षा मी मोठा अशा अविर्भावात काहीही बोलू लागले आहेत नव्हे धमक्याचं देत सुटले आहेत. महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला बाहेर पडावयाचे आहे की काय असा प्रश्न त्यामुळे पुढे आला आहे.

कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्यानंतर ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघात (leadership coaching)डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगलीत संजय राऊत यांचा तीन दिवस तळ पडला होता. एकमेकाची ताकद हसमावण्यासाठी आखाड्यातले पैलवान सुरुवातीला खडाखडी करतात. सांगलीच्या आखाड्यात संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसला लक्कड कोटाच्या बाजूला नेऊन ठेवले आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करावयाचे असेल किंवा ते पंतप्रधान झाल्याचे पहावयाचे असेल तर सांगलीचा हट्ट सोडा असे ते म्हणतात. सांगली म्हणजे पंतप्रधान पदासाठीची लिटमस पेपर टेस्ट आहे काय?

सांगलीमध्ये लक्ष घालाल तर महाराष्ट्रात तुम्हाला आम्ही अडचणीत आणू, तुम्हास आम्ही आमची ताकद दाखवू असा संजय राऊत यांनी इशारा देणे म्हणजे अतिच झाल्यासारखे आहे. मुळातच सांगलीची जागा काँग्रेसची असल्याने त्यांनी तिथे आपला नैसर्गिक राजकीय हक्क सांगितलेला आहे. आणि संजय राऊत यांना तो मान्य नाही. जागा वाटपाच्या चर्चेत वंचित च्या प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी रिंगणा बाहेर ठेवले होते. दोन देतो, तीन देतो, चार देतो, बघा पटलं तर घ्या अशी त्यांची भाषा होती आणि महाविकास आघाडीने त्यांना जणूकाही वटमुखत्यारपत्र दिल्यासारखे ते मीडियासमोर येऊन बोलत होते. वसंतदादांचे नातू विशाल पाटील, पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम हे सांगलीच्या जागेचा गंभीर विषय घेऊन नवी दिल्लीला गेले होते.

आता त्यांनी कुठे जायचे आणि कुठे जायचे नाही हा त्यांचा खाजगी अधिकार आहे. त्यांच्या अधिकारात संजय राऊत यांनी हस्तक्षेप करावयाचे कारण नाही पण तरीही कुणाच्याही सार्वजनिक जीवनात डोकावून पाहण्याचा पत्रकारांना हक्क आहे अशी दुहेरी भूमिका त्यांची दिसते. पाटील आणि कदम हे भाजपाच्या दिशेने जात आहेत असा संशय संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून नव्हे तर राजकारणी म्हणून व्यक्त केला आहे आणि हे आघाडीच्या राजधर्मात कुठेच बसत नाही.

महाविकास आघाडीचे सरकार होतं तेव्हाच्या दोन अडीच वर्षात संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत होते. शरद पवारांची स्तुती ते तोंड फाटेपर्यंत करत होते. आणि आता शरद पवारांच्या राजकीय पडत्या काळात त्यांच्या शिल्लक राष्ट्रवादीलाच ते इशारे देऊ लागले आहेत. सांगलीच्या जागेवरून कुरापत काढून ठाकरे गटाच्या शिवसेनेला महाविकास आघाडीतून बाहेर पडावयाचे आहे असे संकेतच संजय राऊत देताना दिसत आहेत.

संजय राऊत यांच्या तोंड पाटीलकी ला प्रकाश आंबेडकर जसे वैतागले होते तसेच दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे सुद्धा कंटाळले आहेत. संजय राऊत यांनी नाना पटोले, जयंत पाटील या आघाडीतील नेत्यांनाच सध्या अंगावर घेतलेले दिसते. सांगली वरून आघाडी फुटली तर त्याचे जनकत्व संजय राऊत यांच्याकडे असणार आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे सुद्धा बोलताना कोणताही ताळतंत्र ठेवताना दिसत नाहीत. दोन आठवड्यापूर्वीच्या सोमवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे असे भाकीत त्यांनी केले होते. ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे शिंदे गटात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते आणि प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडले नाही.

नितेश राणे यांचा संजय राऊत यांच्याशी उभा दावा आहे. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की नितेश राणे त्यांच्यावर तुटून पडतात. संजय राजाराम राऊत असा पूर्ण नावाने त्यांचा ते उल्लेख का करतात हे मात्र कळत नाही. भारतीय जनता पक्षाने त्यांना मीडियासमोर येऊन भाजपच्या वतीने किंवा भाजपला गृहीत धरून कोणतीही प्रतिक्रिया द्या असे अधिकार पत्रच दिल्यासारखे ते बोलताना दिसतात. सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. आरोपांचा धुरळा उडू लागला आहे. आणि आता अनेकांची तोंडपाटीलकी सुरू झाली आहे. त्यामुळेच नेता मोठा की पक्ष मोठा असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.

हेही वाचा :

गळ्यात 7 चप्पलांचा हार अन् दारोदारी प्रचार, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

हार्दिकला हेच हवं होतं की…; पहिल्या विजयानंतर पंड्याविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा