विराट मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करतानाच अनुष्काला लागली झोप Video Viral

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू अशी ओळख असणारा विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा या दोघांची जोही अनेकांसाठीच एक आदर्श. चांगल्या दिवसांपासून अगदी आव्हानात्मक काळापर्यंत एकमेकांना साध देणारे अनुष्का आणि विराट(Virat kolhli) यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्यावेसुद्धा लक्ष वेधून गेले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या उपांत्य सामन्यादरम्यान अनुष्कानं मैदानात हजेरी लावली होती. यावेळी व्हिआयपी स्टँडमध्ये तिचं असणं विराटसाठी फार महत्त्वाचं असल्याचं पाहायला मिळालं. विराटच्या दमदार खेळीपासून त्याच्या प्रत्येक कृतीला ती दाद देताना दिसली. विराटही(Virat kolhli) मध्येच तिच्याकडे नजर देताना दिसला. ही अनुष्का जेव्हा विराट फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा मात्र डुलक्या खाताना दिसली.

X च्या माध्यमातून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनुष्काचा हा व्हिडीओ शेअर केला. अतिशय निरागसपणे अनुष्काचे डोळे बंद होत होते आणि तीसुद्धा ही झोप न झटकता काही मिनिटांची का असेना पण झोप काढताना दिसली. काही क्षणांचीच का असेना पण मिळालेली ही विश्रांती तिच्यासाठी तितकीच महत्त्वाची होती हेच व्हिडीओ पाहताना लक्षात आलं.

बरं, इथं हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि तिथं नेटकऱ्यांनी त्यावर एकाहून एक सरस प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ‘आई सहसा अशीच झोपते… ‘ असं म्हणत भारतीय महिला मुलांच्या जन्मानंतर इतक्या दगदगीचं आयुष्य जगतात की मुलांची काळजी घेता घेता त्यांना अनेकदा स्वत:ला वेळ देता येत नाही. अखेर अशाच एखाद्या क्षणी त्यांचा डोळा लागतो, असंही काही नेटकरी म्हणाले. अनुष्काचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही काय म्हणाल?

अनुष्कार आणि विराटचा वामिका आणि अकाय अशी दोन मुलं आहे. धाकट्या मुलाच्या जन्मापासूनच अनुष्कानं बहुतांश वेळ परदेशात व्यतीत केला. मुलांच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ देणारी अनुष्का तिच्या सोशल मीडिया फीडमधून कायमच चाहत्यांचं लक्ष वेधत त्यांच्यासोबत संपर्कात राहत असते. त्यामुळं इथं तिला झोप लागताच फॉलोअर्सनी अतिशय सुरेखपणे तिची बाजू सांभाळशून नेल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा :

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ नेत्याकडे असणार आता मंत्रिपदाचा भार

‘या’ दिवशी महिलांसाठी मोफत बस प्रवास! 13 मार्गांवर फुकटात फिरता येणार

 विराट कोहलीमुळे गौतम गंभीर निराश ? चर्चांना उधाण, कोच म्हणाले…