भले, आम्ही असो एकत्र! जाहीरनामा आमुचा वेगळा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अजितदादा पवार(canadian political parties) यांनी तांत्रिक दृष्ट्या त्यांच्या ताब्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला जाहीरनामा सोमवारी प्रसिद्ध केला. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलो तरी आम्ही आमची मूळची ध्येय धोरणे सोडलेली नाहीत. असे त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केले आहे. मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा देणार, यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर भारतरत्न देणार, उर्दू माध्यम शाळांना सेमी मराठीचा दर्जा देणार अशा काही घोषणा केल्या आहेत अर्थात आश्वासने दिले आहेत.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा ही अनेक वर्षांची मागणी आहे. मराठी भाषा अडीच हजार वर्षांपूर्वी बोलली जात होती, लिखित स्वरूपात वापरली जात होती याचे अनेक मजबूत पुरावे असूनही केंद्र शासनाने मराठी भाषेचा अभिजात भाषेसाठी विचार केलेला नाही हे दुर्दैवी आहे. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस(canadian political parties) 2014 पूर्वी केंद्रात सत्तेत सहभागी होती. तेव्हा हा मुद्दा त्यांच्याकडून व्यक्त केला गेला नाही किंवा तशी जोरदार मागणी केंद्र शासनाकडे केली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे. माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातेतही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.

दरवर्षी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाकडून भाषा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात एकूण 48 खासदार आहेत. या सर्वांनी पक्ष भेद विसरून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी एक मुखाने आग्रही मागणी केली असती तर केंद्र शासनाने ती कधीच मान्य केली असती. दुर्दैवाने आज अखेर तसे घडलेले नाही. किंबहुना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय हे सुद्धा अनेकांना माहीत नसावे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळेल तेव्हा मिळो पण सध्या मराठी भाषेची जी सर्व पातळीवर अवहेलना सुरू आहे ती थांबवण्याचा प्रयत्न करणे हे राज्य शासनाच्या हाती आहे. मुळातच राज्य सरकारने शासकीय मराठी भाषेपासून अलिप्त राहिले पाहिजे. कारण ती कोणाला कळतच नाही. शासकीय मराठी मध्ये अमुलाग्र बदल आधी होणे आवश्यक आहे. सरकारी मराठी समजायला इतकी क्लिष्ट आणि अवघड आहे की कि ती भल्याभल्यांना स्पष्टपणे समजत नाही. राज्य शासनाने केलेला एखादा जीआर वाचताना आणि त्याचा अर्थ समजून घेताना किती प्रयास पडतात हे अनुभवाने समजावे. माझी मराठी मुंबईच्या मंत्रालयासमोर दिनवाणी उभी आहे, अशा शब्दात कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांनी व्यथा बऱ्याच वर्षांपूर्वी कवितेच्या माध्यमातून बोलून दाखवली होती. राज्य शासनाकडे भाषा या विषयासाठी स्वतंत्र दालन आहे. दुर्दैवाने तेथे अधून मधून
मराठी अधिकारी खुर्चीवर बसलेला दिसतो.

यशवंतराव चव्हाण हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. राज्यातून ते जेव्हा केंद्रात गेले तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असे म्हटले गेले होते. उत्तम राजकारणी, कमालीची भाषा सभ्यता, स्पष्ट वक्ता, विशाल दृष्टिकोन, त्यांचे भाषण ऐकताना एखादा साहित्यिक बोलतो आहे की काय असा भास व्हावा असा हा अवलिया होता. संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री ते उपपंतप्रधान अशी अनेक पदे त्यांनी भुषवली होती. खरे तर त्यांच्यामुळे या पदांना प्रतिष्ठा मिळालेली होती असे म्हणावे लागेल. लालकृष्ण अडवाणी कर्पुरी ठाकूर, चौधरी चरण सिंग, स्वामीनाथन वगैरे दहा जणांना गेल्या पाच वर्षात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वास्तविक त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण यांचा या सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी विचार होणे आवश्यक होते.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, यशवंतराव चव्हाण यांच्यासह काही नर रत्ने या महाराष्ट्र भूमीत जन्मास आली होती. त्यांनी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे आणि होते. अजित दादा पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारतरत्न पुरस्कारासाठी यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेतले हे अतिशय योग्य झाले. त्यांची राष्ट्रीय पातळीवरील एन डी ए हे आघाडी सत्तेवर आली तर त्यांनी तेच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे. लोकांना आवडेल असे आश्वासन दिले म्हणजे सर्व काही झाले असे होत नाही तर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !

बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रस कारवाईचा बडगा उगारणार, 25 तारखेला बैठक

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा!