पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून, राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा(saffron) घेतल्या जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. तेथे प्रचारावर जोर दिला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात(saffron) महायुती शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेक मातब्बर प्रचारासाठी या दोन मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सभा होणार आहे.

या दोन्ही मतदारसंघात आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार असून, कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 28 एप्रिलला रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

या सभेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकार मधील इतर मंत्री उपस्थित राहणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर नियोजनाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव विशेष काळजी पोलिस तसेच जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. महायुतीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी महायुतीत सहभागी असलेल्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

कोल्हापूर येथील तपोवन मैदान येथे सभेची जय्यत तयारी सुरु आहे.कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून या सभेसाठी करते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी जयत तयारी करण्यात आली आहे. जवळपास एक लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून सभेचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा :

‘आपले’ मतदार गेले कुणीकडे? भाजपचं टेन्शन वाढलं

अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा!

बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रस कारवाईचा बडगा उगारणार, 25 तारखेला बैठक