ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

आयफोन निर्माता कंपनी ॲपलने 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना(company employee) कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद केले आहेत. Appleने कार आणि मायक्रो एलईडी ऍपल वॉच प्रकल्प बंद केल्यानंतर 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

ब्लूमबर्गच्या मते, ॲपलने(company employee) कॅलिफोर्नियामधील 600 हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रकल्पांमधील महत्त्वपूर्ण बदलांचा भाग म्हणून कामावरून काढून टाकले आहे. Apple ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये कार आणि स्मार्ट वॉच डिस्प्ले डेव्हलपमेंटवर आधारित दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद केले होते. यानंतर कर्मचारी कपातीची भीती निर्माण झाली होती.

कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील कारशी संबंधित कार्यालयातून 371 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. अनेक सॅटेलाइट कार्यालयातील इतर अनेक कर्मचारी प्रभावित झाले आहेत. अद्याप ऍपलने नोकरी कपातीबद्दल अधिक तपशील उघड केलेले नाहीत.

हेही वाचा :

दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; संजय राऊत यांचा दावा

तुमची दाढी करून देतो; पण मत द्या, प्रचारासाठी उमेदवारानं… Video Viral

करण जोहरने केला मोठा धमाका, ‘किल’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट