लोकसभा निवडणुकीत स्वत:चा प्रचार करणाऱ्या एका उमेदवाराने हाती वस्तारा(vastara) घेत थेट मतदाराची दाढी करणं सुरू केलं. लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या एका उमेदवारानं आपला प्रचार करताना थेट मतदारांची दाढी करणं सुरू केलंय.
लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालीय. लोकांना लोकशाहीचे महत्त्व सांगितले जात आहे. मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जागरूक करण्यासाठी निवडणूक आयोग मोहीम राबवत आहे. तर उमेदवार(vastara) आपल्या पक्षाचा प्रचारात व्यस्त झालेत. अशात एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराने एका सलूनला भेट दिली. सलूनमध्ये शिरताच या उमेदवारानं हातात थेट वस्ताराच घेतला.
हा व्हिडिओ तामिळनाडूमधील आहे. तेथील अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार परिराजन रामेश्वरम यांचा आहे. त्यांनी एका सलूनला भेट दिली, तेथे जाऊन त्यांनी न्हावीची भूमिका घेतली. तेथे आलेल्या लोकांची दाढी आणि कटिंग करत त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.
माध्यम प्रतिनिधींनी त्यांना यासंदर्भात विचारल्यानंतर ते म्हणाले की, लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचं ते म्हणाले. हे अपक्ष उमेदवार तामिळनाडूतील रामनाथपुरम येथील आहेत. ते निवडणूक प्रचारादरम्यान एक दिवसासाठी न्हावी बनले.
दोन दिवसापूर्वी गोरखपूरमधील उमेदवार रवी किशन यांना आपण चहा बनवताना पाहिलं होतं. रवी किशन गोरखपूरमध्ये जनसंपर्क मोहीम राबवत होते. प्रचारादरम्यान ते एका चहाच्या दुकानात थांबले आणि नंतर त्यांनी आले टाकलेला चहा बनवला. भारत ही अशी भूमी आहे जिथे गरीब असलेला व्यक्ती देश चालवू शकतो.
लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आता तीव्र झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष विविध रणनीती अवलंबत आहेत. निवडणूक प्रचारासाठी रॅली, रोड शो, सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. याशिवाय सर्व पात्र मतदारांना मतदानाची संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोग मतदार यादीत सुधारणा करत आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक आधीच प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये मतदानाच्या तारखा, नामांकन तारखा आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात तरुणीचा खून ….आई भाऊ आणि मामाला अटक
करण जोहरने केला मोठा धमाका, ‘किल’चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट
उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! नियमित प्या बडीशेपचे पाणी; डिहायड्रेशनची समस्या होईल क