आयफोन बनवणारी कंपनी(apple)ॲपल येत्या तीन वर्षांत भारतात सुमारे पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सध्या ॲपल भारतात विक्रेते आणि पुरवठादारांद्वारे 1.5 लाख लोकांना रोजगार देते. ॲपलसाठी दोन प्लांट चालवणारी टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सर्वाधिक रोजगार निर्माण करते. मार्केट रिसर्च कंपनी काउंटरपॉईंट रिसर्चच्या म्हणण्यानुसार, ॲपलने 2023 मध्ये प्रथमच सर्वाधिक कमाई केली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, (apple)ॲपल भारतात नोकर भरती वाढवत आहे. आमचा अंदाज असा आहे की पुढील तीन वर्षांत ते विक्रेते आणि पुरवठादारांद्वारे 5 लाख लोकांना रोजगार देणार आहे. मात्र, ॲपलने यासंदर्भात पीटीआयच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. ॲपलने येत्या पाच वर्षांत भारतात आपले उत्पादन पाच पटीने वाढवून 3.32 लाख कोटी रुपये करण्याचा विचार केला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉईंट रिसर्चच्या मते, Apple 2023 मध्ये पहिल्यांदा कमाईच्या बाबतीत भारतीय बाजारपेठेत पहिल्या क्रमांकावर आहे. विक्रीच्या बाबतीत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग पहिल्या क्रमांकावर आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲपलने कोरोना महामारीपासून चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी धोरण अवलंबले आहे आणि भारतात गुंतवणूक करत आहे. कंपनीने पुढील 3 वर्षात आपल्या पुरवठा साखळीपैकी किमान अर्धा भाग चीनमधून भारतात हस्तांतरित करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत भारतीय पुरवठादारांवर भर देण्यास सुरुवात झाली आहे.
आयफोन बनवणारी आणखी एक तैवान कंपनी टाटा समूह विकत घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा समूह तैवानी कंपनी पेगाट्रॉनच्या भारतीय युनिटमधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही कंपन्यांमधील बोलणी अंतिम टप्प्यात आहे.
याआधी टाटा समूहाने ॲपलची आणखी एक कंत्राटी उत्पादक कंपनी विस्ट्रॉन खरेदी केली आहे. टाटा समूहाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीचे युनिट 1,000 कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि iPhones बनवणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती. भारतात तीन विक्रेते Apple साठी iPhone बनवतात. यामध्ये विस्ट्रॉन, पेगाट्रॉन आणि फॉक्सकॉन यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
पुन्हा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नाही, चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय
महाराष्ट्रात खळबळ! टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग
विराटच्या वादग्रस्त विकेटवर सिद्धूचं मोठं वक्तव्य