आरारारा खतरनाक! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; बघून तुमचेही पाय लागतील थिरकायला, Video Viral

सोशल मीडियावर रोज काही ना काही (Video Viral)व्हायरल होत असते. कधी मजेसीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तुम्ही डान्सचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील.

यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजेच वृद्धांपर्यंतची सर्व मंडळी थिरकताना दिसतात. कधी रस्त्यात, कधी मेट्रोत तर कधी लग्नसंमारंभात अनेकांना डान्स करताना तुम्ही पाहिले असेल. अनेकदा काही डान्स असे हास्यास्पद असतात की, संपूर्ण सोशल मीडियावर हसू पसरते.

तर अनेकदा काही डान्स असे असतात की, बघून त्याचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही, प्रत्येत जण कोणात्या ना कोणत्या ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स बनवतात. सध्या एका हळदीच्या समारंभातील काकांच्या भन्नाट डान्सचा (Video Viral)व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. काका अगदी बेभान होऊन डान्स करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काका हळदीच्या समारंभात बेन्जोच्या तालावर ठुमका धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत अजून एक तरुण देखील आहे. गाणे चालू होताच बेन्जोच्या तालावर काका भन्नाट असा डान्स करायला सुरुवात करतात.

काका अगदी मनसोक्तपणे डान्स करत ठुमका धरतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी काकांचे कौतुक केले आहे, तर काहींनी मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @jagtap_shridhar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लाईक्स मिळाल्या आहेत.

अनेकांनी मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, हळदीत डान्स करण्याची मज्जाच और असते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खूप छा डान्स केला काकांनी. आणखी एका युजरने काकांचा नाद नाय करायचा असे म्हटले आहे. चौथ्या एकाने नाचताना कोणाचा विचार नाही करायचा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

‘न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवतेय’; रोहित पवारांची सरकारवर तीव्र टीका

विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का शर्मा कोणत्या क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये होती?

‘ब्राह्मणाने 4 मुलांना जन्म दिल्यास लाखांचे बक्षीस’; राज्यमंत्र्यांच्या घोषणेचे कारण काय?