लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने एका उच्चभ्रू अपार्टमेंटच्या(youtubetv) ७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. ही घटना हरियाणातील बहादूरगडमध्ये घडलीय. गरवीत ( वय २५), आणि नंदिनी, (वय २२ ) असे या जोडप्याचे नाव असल्याची माहिती मिळालीय. हे दोघेही कंटेंट क्रिएटर होते. ते स्वतःचे चॅनल चालवत होते आणि YouTube आणि Facebook सारख्या प्लॅटफॉर्मसाठी लघुपट तयार करायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हे जोडपे(youtubetv) त्यांच्या टीमसह डेहराडूनहून बहादूरगडला गेले होते. त्यांनी रुहेला रेसिडेन्सीच्या सातव्या मजल्यावर एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथे ते त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या जोडप्याने आत्महत्या केली.
शूटिंगनंतर ते उशिरा घरी परतले होते. एका कुठल्यातरी मुद्द्यावरून या दोघांमध्ये वाद सुरू होता. त्याच वादातून या जोडप्याने ७ मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत.
या दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी एक फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित होती. या जोडप्याने हे पाऊल का उचलले याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा केलेत. घटनेपर्यंतचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. ‘आम्ही या घटनेचा तपास करत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे या प्रकरणाचे तपास अधिकारी जगबीर यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा :
LPG ग्राहकांसाठी अच्छे दिन; 12 सिलेंडरवर 300 रुपयांची मिळणार सबसिडी
मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’