मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये(pink stones) ते जखमी झाले आहेत. विजयवाडा येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रो शोमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रोड शो सुरु असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यापैकी एक दगड मुख्यमंत्र्यांना लागल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दगड लागल्याने छोटी खोच पडली आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे.

युवाजन सार्मिका रायतू काँग्रेस पार्टीचे (आयएसआरसीपी) आमदार वेल्लामपल्ली श्रीनिवास राव हे सुद्धा या हल्ल्यात जखमी झाले आहेत. राव हे मुख्यमंत्री रेड्डी यांच्याबरोबर रोड शो मध्ये सहभागी झाले होते. हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर बसमध्येच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर रेड्डी यांनी आपला रोड शो (pink stones)पुढे सुरुच ठेवला. सध्या रेड्डी हे ‘मिमंथा सिद्धम् बस यात्रा’च्या माध्यमातून रोड शो करत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये.

“मुख्यमंत्री समर्थकांच्या गर्दीला अभिवादन करत असतानाच अचानक एक दगड त्यांच्या कपाळाला लागला. विजयवाडा येथील सिंह नगरमधील विवेकानंद स्कूल सेंटर येथे हा सारा प्रकार घडला,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. आयएसआरसीपीच्या नेत्यांनी या हल्ल्यामध्ये तेलगू देसम पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री रेड्डींना लवकर बरं वाटावं अशा शब्दांमध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “त्यांना लवकर बरं वाटावं आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. के. स्टॅलिन यांनी रेड्डींवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. “आंध्र प्रदेशचे माननिय मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो.

राजकीय मतभेदातून कधीच हिंसाचार घडता कामा नये. आपण लोकशाही मार्गाने एकमेकांना विरोध करताना नियम आणि एकमेकांबद्दल सन्मान कायम ठेवणं गरजेचं आहे. त्यांना लवकर बरं वाटावं अशी इच्छा व्यक्त करतो,” असं स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.

भारतीय राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणचे आमदार के. टी. रामा राव यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. “तुम्ही सुरक्षित आहात हे समजल्यानंतर बरं वाटलं. काळजी घ्या जगन मोहन रेड्डी अण्णा. मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर झालेल्या या हल्ल्याचा तिव्र शब्दांमध्ये निषेध करतो. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात कठोर नियोजन करेल अशी अपेक्षा आहे,” असं केटीआर यांनी म्हटलं आहे.

आंध्रप्रदेशमधील 25 लोकसभा जागांसाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून सध्या राज्यामध्ये मोठ्याप्रमाणात प्रचार सुरु आहे.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (14-04-2024)

LPG ग्राहकांसाठी अच्छे दिन; 12 सिलेंडरवर 300 रुपयांची मिळणार सबसिडी

मोठा ट्विस्ट… सांगलीत बंड होणार?, प्रकाश आंबेडकर कुणाला देणार पाठिंबा?