आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान(kiss 2023) याचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खान याच्या आयुष्यात एका परदेशी मॉडेलची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली आहे. आर्यन एका ब्राझिलियन मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आर्यन याच्यासोबत ज्या मॉडेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ती दुसरी तिसरी कोणी नाहीतर, लारिसा बोन्सी आहे.

आर्यन आणि ब्राझिलियन मॉडेलच्या(kiss 2023) रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना रेडिटवर दोघांचा एक व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आर्यन खान, ब्राझिलियन मॉडेल आणि त्यांचे इतर मित्र देखील दिसत आहेत. रेडिटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लारिसा बोन्सी, आर्यन याला फ्लाइंग किस देताना दिसत आहे.

लारिसा बोन्सी आणि आर्यन खान यांच्या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लारिसा बोन्सी आणि आर्यन खान यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी देखील एक व्हिडीओ समोर आला होता, त्या व्हिडीओमध्ये आर्यन, लारिसा बोन्सी हिच्या कुटुंबासोबत दिसला होता.

एवढंच नाहीतर, आर्यन याने लारिसा बोन्सी हिची आई रेनाटा बोन्सी यांना D’YAVOL X चा एक जॅकेट देखील दिल्याची माहिती समोर आली होती. दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण शाहरुख खान, गौरी खान, आर्यन खान यांनी यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

लारिसा बोन्सी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. शिवाय काही तेलुगू सिनेमात देखील लारिसा बोन्सी हिने काम केलं आहे. सध्या सर्वत्र लारिसा बोन्सीआर्यन खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. पण दोघे खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाहीत.. यावर अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

आर्यन खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या पहिली सीरीज स्टारडमची तयारी करत आहे. आर्यन खान याला अभिनयात रस नसून, लेखण, दिग्दर्शन क्षेत्रात किंग खानचा लेक करिअर करणार आहे… असं खुद्द शाहरुख खान म्हणाला आहे. किंग खान कायम मुलांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

हेही वाचा :

सनी लियोनी हिचा पहिला साखरपुडा, ‘तो’ पुरुष आणि बरंच काही…

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल