वस्त्रनगरीला धक्का! माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन

इचलकरंजी नगर परिषदेचे माजी नगरसेवक नितीन अशोकराव जांभळे यांचे नुकताच हृदयविकाराच्या(heart attacks symptoms) धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्र नगरी व परिसराला मोठा धक्का बसला असून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नितीन जांभळे(heart attacks symptoms) यांनी अल्पावधीतच नगरसेवक, बांधकाम सभापती अशा अनेक जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने सांभाळल्या होत्या. त्यांनी संघटन कौशल्य देखील अगदी मजबूत केलं होतं. वस्त्र नगरी व परिसरातील संपूर्ण युवा वर्ग त्यांचा शब्द आदराने मानत होता.

इतकेच नाही तर इचलकरंजीच्या सध्या सुरू असणाऱ्या पाणी प्रश्नावर त्यांनी विशेष भूमिका घेत प्रचंड आक्रमकपणा त्यांनी स्वीकारला होता. आणि त्या दृष्टीने ते कार्यरत होते. एखाद्याला शब्द देणे आणि त्याचवेळी त्याचे काम पूर्ण करून देणे हा त्यांचा मोठा गुण प्रत्येकाच्या परिचयाचा होता. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा देखील सांभाळली होती.

माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे ते सुपुत्र होत. नितीन जांभळे यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्र नगरीवर मोठी शोककळा पसरली असून शहरातील सर्वच राजकीय नेते व कार्यकर्त्यां सह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

‘गरीबी हटाव’चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र