ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, आमदार भरत गोगावले यांचे पुत्र(Attack) विकास गोगावले यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर(Attack) यांच्यावर बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. हा हल्ला शिंदे गटाकडून करण्यात आल्याची आरोप होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा हल्ला झाल्याने रायगडमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

अनिल नवगणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला आहे. यात नवगणे यांना दुखापत झाली नाही, पण त्यांच्या गाडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते.

या हल्ल्याच्या वेळी आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे उपस्थित होते, असा आरोप अनिल नवगणे यांनी केला आहे. विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल (गुरुवारी) महाड येथे महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेमध्ये ठाकरे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आपल्या भाषणात आमदार गोगावले पित्रापुत्रावर जोरदार टीका केली.

सभा संपल्यानंतर नवगणे आपल्या घरी रवाना होत असताना मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञान व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हा प्रकार रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. नवगणे यांच्या गाडीवर हल्ला करुन हल्लेखोरांनी अंधारातून पळ काढला. हल्ल्यात नवगुणे यांना दुखापत झालेली नाही. मात्र त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला

आजचे राशी भविष्य (03-05-2024)

काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार