मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

मुंबई- ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेल्या हेलिकॉप्टरचा(big news) अपघात झाला आहे. यात पायलट सुखरुप असल्याचं कळतंय. महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते. येथून त्या बारामती येथे सभेसाठी जाणार होत्या. पण, याठिकाणी हेलिकॉप्टर आल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झालं आहे.

सुषमा अंधारे या सुखरुप आहेत. त्या हेलीपॅडवर पोहोचल्यावर त्यांना हेलिकॉप्टर क्रॅश(big news) झाल्याची माहिती मिळाली. सुषमा अंधारे यांचा राज्यभर दोरा सुरु आहे. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर महाड येथे आले होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सकाळी एका प्रचारसाठी जाणार होतो. दिवसभरात दोन-तीन सभा होत्या. रात्रीची महाडची सभा करुन आम्ही रात्री येथे थांबलो होते. हेलिपॅडवर आलो तेव्हा हेलिकॉप्टर घिरट्या मारत होतं. अचानक ते कोसळलं. मी आणि माझा भाऊ हेलिकॉप्टरने प्रवास करणार होता. पण, सुदैवाने आम्हाला काहीही झालं नाही. आम्ही सुखरुप आहोत.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (03-05-2024)

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; शिंदे गटातील आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत मनसेला धक्का; बड्या नेत्यावर खंडणी, मारहाणीचा गुन्हा दाखल