म्हात्रे यांचे गोदाम ‘सील’ करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस (congress)(शरदचंद्र पवार) पक्षाने भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या घोषणेनंतर काही तासांतच त्यांच्या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्‍यासाठी पोहचले.


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस (congress)(शरदचंद्र पवार) पक्षाने भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या घोषणेनंतर काही तासांतच त्यांच्या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे पथक कारवाई करण्‍यासाठी पोहचले. मात्र गोदामावरील कोणताही कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती दिल्याने कारवाई न करताच पथकाला परतावे लागल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.
ही कारवाई राजकीय दबावातून करत असल्याची टीकाही त्यांनी केली. म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा होताच भिवंडी येवाई येथील म्हात्रे यांच्या ‘आर. के. लॉजी वर्ल्ड’ या गोदाम संकुलावर ‘एमएमआरडीए’चे एक पथक गुरुवारी सायंकाळी गोदाम ‘सील’ करण्याची कारवाईसाठी आले. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे.


त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी दिली. त्यानंतर ‘एमएमआरडीए’चे अधिकारी व पथकाला कारवाई न करताच परतावे लागले.
सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच, त्यांच्या गोदामावर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए प्रशासन कामाला लागते, ही आश्चर्याची बाब आहे. अशा पद्धतीने घाबरविण्याचा प्रयत्न केला जात असून आम्ही घाबरणारे नसून आम्ही लढणारे आहोत.

हेही वाचा :

साखरपुडा झाला होता, लग्न मात्र जमलं नाही…!

ऑपरेशन फोडाफोडी… ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार, 30 नगरसेवक फुटणार?

UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय