जळगाव पाठोपाठ आता रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (Congress)शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपच्या नाराज चेहऱ्याला हेरल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळेच या मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांना पक्षात प्रवेश देत करण पवार यांना उमेदवारी देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. आता याचीच पुनरावृत्ती रावेर मतदारसंघात करण्याची खेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खेळली जात आहे. (Congress)त्या दृष्टीने या मतदारसंघातील तिकीट नाकारलेला भाजपातील नाराज चेहरा पवार गटाने हेरला त्याच्या चर्चा सुरु असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे. या खेळीमुळेच रावेर मतदारसंघात पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे.
महाविकास आघाडीत रावेर मतदासंघाची जागा शरद पवार गटाच्या वाटाल्या आली आहेत. या मतदारसंघातून भाजपाने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली आहे. खडसे यांची उमेदवारी जाहीर होवून दोन आठवडे उलटून देखील शरद पवार गटाने या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही.
जळगावची पुनरावृत्ती शक्य?
जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने तिकीट कापलेले खासदार उन्मेश पाटील यांना फोडून पक्षात घेत त्यांचे मित्र करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. अगदी तशीच खेळी रावेर मतदारसंघात शरद पवार यांनी सूरु केली आहे. याच मतदारसंघातील भाजपाच्याच एका निष्ठावंत घराण्याचा तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या युवा चेहऱ्याला संधी देण्याची तयारी शरद पवार गटाने केली आहे.
त्या ’नाराज’ तरुणाशी चर्चा सुरु
रावेर मतदारसंघातील भाजपाच्या निष्ठावंत परिवारावर सातत्याने अन्याय होत असल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने तेथिल समर्थक आक्रमक झाले होते. मात्र, भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन यांनी ते बंड शांत केले होते. मात्र, या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी शरद पवार गटाने पावले उचलली आहेत. आमदार रोहित पवार यांनी संबंधित युवा नेत्यासोबत मुंबईत गुप्त बैठक घेतल्याचे वृत्त आहे. हा भाजपाचा नाराज युवा पदाधिकारी लेवा समाजाचा असल्याने त्याचा मतदारसंघात प्रभाव आहे. पवार गटाच्या गळाला लागल्यास रावेर मतदारसंघात देखील भाजपाला मोठा धक्का बसून निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
साखरपुडा झाला होता, लग्न मात्र जमलं नाही…!
UPI वरुन करता येणार Cash Deposit, RBI चा पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय
‘धक-धक गर्ल’च्या मधूर आवाजाने लावलं वेड VIDEO व्हायरल