मनुष्य जीवनात कितीही उच्चतर ध्येय ठेवत असला, तरी पोटापाण्याला विसरू शकत नाही. घरातील पदार्थांबरोबरच खवय्याला बाहेर हॉटेलमध्ये(hotel) खाणंही आवडतं.
- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ
मनुष्य जीवनात कितीही उच्चतर ध्येय ठेवत असला, तरी पोटापाण्याला विसरू शकत नाही. घरातील पदार्थांबरोबरच खवय्याला बाहेर हॉटेलमध्ये खाणंही आवडतं. त्यामुळे हॉटेल (hotel)व्यवसाय बरकतीचा मानला जातो. हॉटेलसोबतच हॉस्पिटॅलिटी, प्रवास, इव्हेंट्स, आदरातिथ्याच्या पद्धती, कॉर्पोरेट कल्चर हे आता परवलीचे शब्द झाले आहेत. या सर्वांशी संबंधित असलेल्या या कार्यक्षेत्रासाठी प्रशिक्षित करणारी पदवी आहे बीएचएमसीटी (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी).
कालावधी
या पदवीचा कालावधी बारावीनंतर चार वर्षांचा आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावीची परीक्षा किमान ४५ टक्क्यांनी (राखीव गटासाठी ४०%) उत्तीर्ण झालेली असावी. MAH-HM-CET ही प्रवेशपरीक्षा घेतली जाते. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असतो. परीक्षा बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) स्वरूपाची असून, माध्यम इंग्रजी असते. एकूण १०० प्रश्न आणि १०० गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग नसते. इंग्लिश, रिझनिंग, चालू घडामोडी, संस्कृती, खेळ, व्यापार, पर्यटन, शास्त्रीय शोध आदी अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतात. (प्रवेशाचे आणि पात्रतेचे नियम संस्थापरत्वे बदलू शकतात.)
विषय
फूड प्रॉडक्शन, कीचन ऑपरेशन मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग ऑपरेशन्स, फूड अँड बीवरेज सर्व्हिस, इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी, मार्केटिंग मॅनेजमेंट, कुलिनरी प्रॅक्टिस, हॉटेल इकॉनॉमिक्स, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन, ॲडव्हान्सड फूड प्रॉडक्शन, हॉटेल इन्फॉर्मेशन सीस्टिम, बँक्वेट मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, इव्हेंट प्लॅनिंग आदी विषय असतात.
स्वरूप
विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण सत्रे, इंटर्नशिप आणि उद्योग भेटीद्वारे प्रत्यक्ष अनुभव मिळतो. हे व्यावहारिक अनुभव विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेले थिअरी स्वरूपातील ज्ञान वास्तविक परिस्थितींमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरतात. यामुळे त्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात आवश्यक कौशल्ये आणि क्षमता विकसित करता येतात. हॉटेल आणि खानपान उद्योगाच्या विविध पैलूंमध्ये कौशल्य, ज्ञान आणि व्यावहारिक प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. फूड प्रॉडक्शन, कूकिंग, केटरिंग, फ्रंट डेस्क ऑपरेशन्स, हाऊस कीपिंग, मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, फायनान्स अशा प्रकारच्या कामांचे इत्थंभूत ज्ञान दिले जाते. प्रात्यक्षिक अध्यापनावर अधिक भर दिला जातो.
हेही वाचा :
शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त
सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?
मी कसलेला पैलवान, माझ्या नादाला लागू नये; सतेज पाटीलांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम