बीटेक : फूड टेक्नॉलॉजी

शेतकऱ्याच्या(farmers) शेतात तयार झालेला शेतमाल थेट आपल्या घरात येऊन आपण थेटपणे ते खाणे किंवा त्याचे जिन्नस तयार करणे ही पारंपरिक पद्धत झाली.


शेतकऱ्याच्या(farmers) शेतात तयार झालेला शेतमाल थेट आपल्या घरात येऊन आपण थेटपणे ते खाणे किंवा त्याचे जिन्नस तयार करणे ही पारंपरिक पद्धत झाली. परंतु, अन्नपदार्थांमधील अनेकविध प्रकार, विविध प्रॉडक्ट्स तंत्रज्ञानातून निर्माण करणे हे प्रामुख्याने फूड टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट होते.

विविध तंत्रज्ञान वापरून अन्नपदार्थ तयार करणे, त्यासाठी शास्त्रोक्त प्रक्रिया करणे, व्यवस्थित पॅकेजिंग करणे, अन्नाची गुणवत्ता राखणे, आधुनिक तंत्रांचा वापर करून साठवणूक करणे, सुरळीतपणे पुरवठा करणे अशी अनेक कामे फूड टेक्नॉलॉजी कार्यक्षेत्रात केली जातात.

आंबा आणि आंब्यांचे ज्यूस, कैरी आणि लोणचे, मिरच्या आणि मसाले इथपासून सुरू झालेला प्रवास आता जवळजवळ सर्वच पदार्थांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून केला जात आहे आणि ही तयार उत्पादने थेटपणे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. हे सर्व फूड टेक्नॉलॉजीमुळे शक्य होत आहे.

बीटेकसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्ससह बारावी सायन्स उत्तीर्ण असणे ही पात्रता आहे. बायोलॉजी हा विषय असणे अपेक्षित आहे. जेईई, तसेच एमएच सीईटी या प्रवेशपरीक्षा पार करून आपल्याला बीटेकसाठी प्रवेश मिळू शकतो, तर बीएससीसाठी पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी) ग्रूप पुरेसा आहे. फूड टेक्नॉलॉजी संदर्भात अन्य पदव्यांसाठी इतर निकष आहेत. जसे की, बीएस्सीसाठी बारावी सायन्सचे गुण पाहिले जातात.

बीटेक हा बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा पूर्ण वेळ पदवी कोर्स आहे. तज्ज्ञांच्या थिअरी लेक्चरसोबतच प्रात्यक्षिकांमधूनही शिकविले जाते. प्रयोगशाळेपासून यंत्रशाळेपर्यंत आणि शेतापासून मार्केटपर्यंतचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते. शेवटच्या वर्षात प्रोजेक्ट वर्क असते. इंटर्नशिपद्वारे प्रत्यक्ष कामकाजाचा अंदाज येतो.

अन्नावरील प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे, अन्न साठवणूक उपकरणे आणि तंत्रप्रणालींची काळजी घेणे, अन्नाची प्रक्रिया, पॅकेजिंग आणि हाताळणी यांविषयीचे डिझाइन करणे, प्रोटोटाइप मशिनरी, उपकरणे आणि अन्न प्रक्रिया, सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि नियमन नीट करणे.

सध्या आउटसोर्सिंगचा जमाना आहे. लोक इथून पुढे आपापल्या कामांमध्ये व्यग्र असण्याचे प्रमाण आणखी वाढत जाईल. अन्नपदार्थ स्वतः तयार करणे हे काम हळूहळू मागे पडून आता रेडिमेड फूडकडे म्हणजेच फास्ट फूडकडे आपण वळत आहोत. दुसऱ्या बाजूला विविधता असलेले, चविष्ट, अन्नघटकांचा शास्त्रोक्त समतोल असलेले पदार्थ स्वच्छतेचे निकष पाळून तयार करून विकण्याचे प्रमाण वाढते आहे. याचाच अर्थ या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे.

हेही वाचा :

प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला येतोय मुखवट्यांचा “बोहाडा”…

अरविंद केजरीवाल यांचा मुक्काम तुरुंगातच, दिल्ल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मोठी बातमी! काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील ‘Not Reachable’