चिखलदराच्या सिमोरी गावात एक धक्कादायक घटना घडली (condition)आहे. एका २२ दिवसाच्या बाळाला गरम विळा तापवून ६५ वेळा चटके देण्यात आलं आहे. गावातील भोंदूबाबाने हे चटके दिल्याची चर्चा असून, या संतापजनक घटनेमुळे अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात उपचार सुरू आहे.

बाळाला श्वास घ्यायला त्रास झाला, म्हणून बाळाच्या नातेवाईकांनी भोंदू बाबाकडे नेले. भोंदूबाबांनी त्याला चटके दिल्याची माहिती समोर आली आहे. बाळाला चटके दिल्यानंतर(condition) त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली. बाळाला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यावर बाळाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मुलाला चटके कुणी दिले ते मला माहित नाही. जेव्हा चटके दिले तेव्हा मी घरी नव्हतो. अशी प्रतिक्रिया लहान बाळाच्या वडिलांनी दिली. त्यामुळे बाळाच्या पोटाला नेमके चटके कुणी दिले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेळघाटात लहान बाळांना कुठलाही आजार झाला तर, ज्येष्ठ सदस्यांकडून पोटावर चटके देण्याची प्रथा आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, असा(condition) अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यावर खासगी रूग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळाला पोटाला गरम चटके दिल्याची चर्चा आहे. बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. बाळाला नागपूरच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आलं आहे.
हेही वाचा :
प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral
सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;
माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट