बंगळूरुची कोहलीवर भिस्त

चांगल्या लयीत नसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (royal challengers bangalore)संघाचा सामना शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे.


जयपूर : चांगल्या लयीत नसलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (royal challengers bangalore)संघाचा सामना शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) राजस्थान रॉयल्स संघाशी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांना आपल्या शीर्ष फळीतील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
बंगळूरुचा संघ चार सामन्यांत एका विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर राजस्थानच्या संघाने आपले तीनही सामने जिंकले असून ते सहा गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. कामगिरीत सातत्य असूनही त्यांच्या शीर्ष फळीतील फलंदाजांना चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले आहे.

त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानला आपल्या चुका सुधारण्याची संधी आहे. दुसरीकडे, बंगळूरुच्या फलंदाजांनाही आपली ‘आयपीएल’ मोहीम योग्य वळणावर आणायची असेल, तर या सामन्यात कामगिरी उंचावण्याशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा :

यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग

Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु

सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ