भाजप स्थापना दिन : मुस्लीम प्रमुख पाहुणा आणि गांधींजींचा फोटो…

आणीबाणीमुळे इंदिरा गांधींविरोधातील संताप 1977 साली मतपेटीतून बाहेर (Congress0आला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनता पार्टीच्या रुपात पहिलं बिगर-काँग्रेस सरकार केंद्रात सत्तेत आलं.

पण हे यश फार काळ टिकलं नाही. तीनच वर्षात अंतर्गत(Congress) धुसफुशीतून केंद्रातलं हे सरकार कोसळलं आणि जनता पार्टीचे तुकडे झाले.

त्यातलाच एक तुकडा म्हणजे, आजची भारतीय जनता पार्टी, अर्थात ‘भाजप.’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कुशीची उब आणि जनता पार्टीतली घुसळण या दोहोंतून भाजपचा जन्म झाला, असं एका वाक्यात सांगता येईलही. पण इतकंच सांगावं, इतकाच काही मर्यादित इतिहास नाही.

कारण भाजपच्या निर्मितीत अनेक नेत्यांचा, अनेक घटनांचा आणि अनेक रंजक किश्शांचाही हातभार आहे. भाजपच्या जन्माची कहाणी सांगताना मी तुम्हाला याच तिन्ही गोष्टींच्या आधारे ती सांगणार आहे.

भाजपला जन्म देणाऱ्या दोन संघटना
भाजपची मुळं सापडतात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (RSS) च्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनसंघात. त्यामुळे तिथूनच सुरुवात करू.

27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. मात्र, 5 मे 1951 रोजी जनसंघाची स्थापना होईपर्यंत संघाची कुठलीच राजकीय शाखा नव्हती.

काँग्रेसच्या सेवा दलाच्या संस्थापकांपैकी एक नारायण हर्डीकर आणि तत्कालीन हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर या दोघांनी संघाला राजकीय पक्ष म्हणून समोर येण्याची विनंती केली होती. मात्र, संघ सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरच काम करेल, असं म्हणत पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवारांनी राजकीय पक्ष स्थापनेला विरोध केला.

अटल बिहारी वाजपेयी 14 वर्षं एकांतवासात काय करत होते?
अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल- एक हळूवार प्रेमकहाणी
मात्र, 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची नथुराम गोडसेनं हत्या केली. या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यात आली. या काळात माधवराव सदाशिवराव गोळवलकर सरसंघचालक होते.

संघावरील बंदीमुळे राजकीय पक्षाची आवश्यकता अधिक भासू लागली. गोळवलकरांनाही स्वत:ला असं वाटत होतं. मात्र, संघाला पूर्णपणे राजकीय पक्षात रूपांतरीत करण्यास त्यांचा विरोध होता.

हेही वाचा :

साखरपुडा झाला होता, लग्न मात्र जमलं नाही…!

ऑपरेशन फोडाफोडी… ठाकरे गट भाजपला खिंडार पाडणार, 30 नगरसेवक फुटणार?

हे कसले अँगल्स, कुठे झूम करताय? पापाराझींवर भडकली अभिनेत्री