सोने खरेदीचे उत्तम पर्याय!

भारतीय संस्कृतीमध्ये सोने(gold) खरेदीला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये सोने खरेदी करण्याचा प्रश्न निर्माण झाला की, दर महिन्याला येणारा गुरुपुष्यामृताचा मुहूर्त असो किंवा येत्या दिनांक 10 मे रोजी असलेला अक्षय्य तृतीयेचा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकीचा मुहूर्त असो, त्यावर साधकबाधक चर्चा होत असते. सोन्याचे दर गेल्या काही महिन्यांत चांगलेच तेजाळलेले असून या वेळचा शुभ मुहूर्त सोने खरेदीसाठी गाठावा किंवा कसे याबाबत विवेचन करणारा लेख.

पारंपरिक किंवा ऐतिहासिकदृष्टय़ा पाहिले तर सोने (gold)हे अत्यंत गुंतवणुकीची अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह मालमत्ता आहे. भारतामध्ये तर प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा कुटुंबामध्ये थोडय़ाफार घरात सोने खरेदी केलेले असतेच. किंबहुना अडीअडचणीला किंवा एखाद्या आर्थिक अडचणीच्या प्रसंगी घरातले सोने तारण ठेवून पैसे उभे करणे हा देशातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातला राजरोस किंवा नेहमी चालणारा व्यवहार असतो. सोने आणि चांदी ही केवळ पारंपरिक खरेदी करण्याची मालमत्ता नसून गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही सोने-चांदी खरेदीकडे पाहिले जाते. अर्थात एक गोष्ट नमूद केली पाहिजे की, चांदीच्या तुलनेत सोन्यात जास्त प्रमाणात गुंतवणूक केली जाते. चांदीबाबत गुंतवणूक म्हणून नाही पाहिले तरी प्रत्येक कुटुंबामध्ये जर पूजाअर्चा किंवा अन्य काही सण साजरे केली जात असतात तर त्यासाठी चांदीची बनवलेली उपकरणे, देवांच्या मूर्ती किंवा भेट देण्यासाठी अनेक चांदीच्या वस्तू यांची सर्रास खरेदी केली जात असते.

गेल्या काही वर्षांमध्ये सोने खरेदीच्या बाजारपेठेत अनेक बदल झाले आहेत. त्यात प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोन्याची वेढणी, बिस्किटे किंवा दागिने खरेदी करता येऊ शकतात, पण त्याचबरोबर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसमोर सोने खरेदीच्या बाबतीत अन्य सुलभ पर्याय निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये शेअर बाजारात जशी शेअर्सची खरेदी विक्री केली जाते, त्याप्रमाणे गोल्ड ईटीएफ म्हणजे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड खरेदी करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेंद्र सरकारच्या वतीने सोन्याचे रोखे ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ विक्रीस काढत असते. म्युच्युअल फंडमध्ये ज्याप्रमाणे सर्वसामान्य गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो, त्याचप्रमाणे आता गोल्ड म्युच्युअल फंडसुद्धा उपलब्ध आहेत. अलीकडे त्याच्यात जी भर पडलेली आहे ती डिजिटल गोल्डच्या खरेदीची. एपंदरीत प्रत्यक्ष सोन्याच्या पेढीवर जाऊन सोने खरेदी करणे हा जसा चांगला मार्ग आहे, त्याचप्रमाणे प्रत्यक्षात दुकानात न जाता किंवा सोन्याच्या पेढीवर न जाता घरी बसूनसुद्धा सोन्याची खरेदी करता येणे आता सहज शक्य झाले आहे. गुंतवणूकदारांनी या अशा संधीचा नक्की फायदा घ्यायला हरकत नाही. मात्र त्यासाठी प्रत्येक प्रकाराचा त्यांनी अभ्यास करणे, त्याचे फायदे किंवा तोटे लक्षात घेणे आवश्यक आहे.

भारतातील महिला वर्गामध्ये सोन्याचे आकर्षण किंवा ज्याला वेड म्हणतात, ते जगात अन्य कोठेही पाहायला सापडत नाही ही वस्तुस्थिती आहे. सोन्या-चांदीची बाजारपेठ जागतिक पातळीवरील सर्व राष्ट्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कार्यरत असते. भारत तर गेली कित्येक दशके सोन्याची आयात करत असतो. जगभरातील एकूण आर्थिक विकासाचा दर, बँक व्याजाची दररचना किंवा भाववाढ, महागाईची आकडेवारी, सट्टारूपी व्यवहारांचे प्रमाण व भौगोलिक युद्धसदृश परिस्थिती या सर्वांचा परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारपेठांवर सातत्याने होत असतो. 2024 या वर्षाची पहिल्या तीन महिन्यांची कामगिरी पाहिली तर गेल्या तिमाहीमध्ये सातत्याने सोन्याचे दर लक्षणीयरीत्या वर जात आहेत. सध्या सोन्याचा दहा ग्रॅमचा दर 73 हजार 800 रुपयांच्या घरात आहे. गेल्या तीन महिन्यांत त्यात तब्बल 14.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गेल्या सहा महिन्यांत त्यात 19.18 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर त्यात 120.64 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एक गोष्ट नक्की आहे की, सोन्याचे दर शेअर बाजारासारखे कधी फारसे खाली जात नाहीत किंवा कोसळत नाहीत. त्यात सातत्याने चांगली वाढ होत असते आणि गुंतवणूक म्हणून वर्षानुवर्षे त्यावर चांगला परतावा मिळणे शक्य असते. त्यामुळे गुंतवणुकीचा विचार केला तर अल्पकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याची गुंतवणूक करण्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार करणे हे कधीही श्रेयस्कर ठरते.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी वाढत्या किमतीला सोने घ्यावे किंवा कसे? असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्यांनी त्यांना जमेल तेवढय़ा किंवा शक्य असेल त्या रकमेने थोडे थोडे सोने जमा करत राहणे हे अत्यंत लाभदायक ठरते. अगदी अर्धा ग्रॅम, एक ग्रॅमपासूनही तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता. त्यामुळे एकदम मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा छोटय़ा छोटय़ा रकमा या सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे अनेक वेळा हितकारक ठरते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक वेळा प्रत्यक्ष दुकानात जाऊन सोने खरेदी करणे, नंतर ते घरामध्ये अत्यंत सुरक्षित पद्धतीने किंवा बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवणे हे खूप जिकिरीचे किंवा धोकादायक ठरू शकते हे लक्षात घेऊन डिजिटल म्हणजे कागदपत्री सोने खरेदी करणे हा एक अत्यंत सुलभ, सुरक्षित मार्ग सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उपलब्ध आहे. यामध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (गोल्ड ईटीएफ) किंवा सार्वभौम सोन्याचे रोखे हेसुद्धा खरेदी करणे हा खरेदीचा चांगला मार्ग आहे. अनेक वेळा काय होते की, अक्षय्य तृतीयेसारख्या मुहूर्ताच्या वेळी सर्वच स्तरांतून मागणी वाढत असल्यामुळे साहजिकच त्याच्या दरातही तशी वाढ होत असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भावनावश होऊन खरेदी करावी अशी आता परिस्थिती राहिलेली नाही. जेव्हा जेव्हा सोन्याचे दर स्थिर असतील किंवा ते कमी आहेत असा आपला अंदाज असेल त्या त्या वेळेला सोन्याची खरेदी करायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मुहूर्तापेक्षा आधी काही दिवससुद्धा सोने खरेदी करावे असे निश्चित वाटते.

घराघरांमध्ये सुरक्षित पद्धतीने सोने किंवा दागिने ठेवणे हे दिवसेंदिवस खूप जोखमीच

हेही वाचा :

टाटा कंपनीचे सीईओ क्रितिवासन पगार म्हणून घेतले तब्बल इतके कोटी

ब्रेंकिंग! संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी

‘या’ अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक; संतप्त चाहत्यांकडून कारवाईची मागणी