‘तुझं लग्न कधी होणार?’ प्रश्नाने झाला हैराण, अखेर शेजाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

वयात आलेल्या आपला मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येत पालकासाठी लग्न(extreme) हा विषय जिव्हाळाचा असतो. केवळ तुम्हीच नाही तर तुमच्या आजूबाजूचे अनेक लोक जे वयात आलेल्या मुला-मुलींच्या लग्नाची विचारपूस करत राहतात. विविध कार्यक्रमांतून भेटल्यानंतर काय मग लग्न कधी करताय? यंदा कर्तव्य आहे की नाही?, कधी दाखवताय सूनमुख? असे प्रश्न आपल्यापैकी अनेकांना केलं असणार.साधारणपणे, हा ट्रेंड जगभरात तुरळकपणे दिसून येतो.

अनेकदा प्राथमिक संवाद (extreme)साधताना नाव, नोकरी, मूळचे कुठले याबरोबरच लग्न झालं आहे की नाही हे सुद्धा विचारलं जात. सामान्यपणे लग्न झालं नसेल तर कधी करणार हा प्रश्न तर सहाजिकच असतो. मात्र वारंवार हाच प्रश्न विचारणं प्रत्येकाला आवडेलं असं नाही. अशी एक धक्कादायक घटना समोर आली. वारंवार विचारलेल्या प्रश्नाला कंटाळून शेजाऱ्याची हत्या केल्याचे समोर आलं आहे.

समाजाचे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे तरुणांकडे फारच कमी आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही किती कमावता? तुमचे वय किती आहे? आणि एक प्रश्न जो समाजातील तरुणांना तसेच बॉलीवूड स्टार्सना सतावतो असतो. जसं की, सलमान खानच्या आयुष्यातला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, तू लग्न कधी करणार आहेस… लग्न करणार की नाही? असं अनेक प्रश्न पडतात. पण तुम्ही कधी विचार पण केला नसेल, इंडोनेशियातील एका व्यक्तीने प्रश्नाला वैतागुन वृद्धाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

इंडोनेशियातील सुमात्रा येथे 45 वर्षीय पारलिंदुंगन सिरगार नावाच्या व्यक्ती शेजाऱ्यांच्या प्रश्नांमुळे त्रस्त झाला होता. 60 वर्षांचे असगिम इरियंटो हे निवृत्त नागरी सेवक होते. जे सिरगारच्या शेजारी राहत होते. असगिम इरियंटो हे वारंवार आरोपीला ‘तुझं लग्न कधी होणार? वयाच्या ४५ व्या वर्षी अविवाहित का? असं प्रश्न विचारायचं. याचाच राग मनात धरुन पारलिंदुंगन सिरगारने असगिम इरियंटोला संपवण्याचा निर्णय घेतला.

ही घटना 29 जुलै रोजी उघडकीस आली असून वृद्धाच्या पत्नीने याबाबत पोलीस अधिकारी मारिया मारपांग यांना माहिती दिली. तिने सांगितले की, हल्लेखोराने तिच्या घराचा दरवाजा तोडला आणि पतीवर लाकडाच्या तुकड्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. पी सिरेगर असे या व्यक्तीचे नाव आहे. मात्र, आजूबाजूच्या लोकांनी सिरेगरला थांबवले. वृद्धाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर वृद्धाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या सर्व प्रकारानंतर हल्लेखोराला तातडीने अटक करण्यात आली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरेगर यांनी पोलिसांना सांगितले की, वृद्ध व्यक्तीच्या प्रश्नांमुळे हैराण झाला होता. या प्रश्नांना कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. वयाच्या ४५ व्या वर्षी अविवाहित का आहे, असे त्यांना वारंवार विचारले जात होते

हेही वाचा :

दीरासोबत प्रेमाचं सूत जुळलं, पण नवऱ्याला सगळं कळलं; अन्…

कोहलीमुळे मैदानात ‘विराट’ राडा! हेल्मेट आपटलं… Video

लाडकी बहीण योजनेवर कोर्टाचा मोठा निर्णय, पहिल्या हप्त्याचं काय होणार?