लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : अरविंदर सिंह लवली यांच्या काँग्रेस पक्षाचा प्राथमिक(current political news) सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

आज शनिवारी माजी दिल्ली काँग्रेस(current political news) अध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अरविंदर सिंह लवली यांनी काँग्रेसच्या दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दिल्लीत काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत युती केल्याने अरविंदर नाराज झाले होते. त्यानंतर अरविंदर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज शेकडो कार्यर्त्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

तसेच त्यांच्यासोबत नसीब सिंह, नीरज बसोया आणि अमित मालिक यांनीही पक्षात प्रवेश केला. अरविंदर सिंह हे शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात मंत्री होते. तसेच दिल्ली काँग्रेसमधील अनेक पदे देखील भूषवली आहेत.

अरविंदर सिंह लवली यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, विनोद तावडे आणि दिल्ली भाजपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या योगानंद शास्त्री यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनीही दिल्ली सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं आहे. दिल्लीच्या सात जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा :

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढले?, Video Viral

प्रियांका चोप्रा हिच्या नवऱ्याची प्रकृती चिंताजनक, व्हिडीओ व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आम. आवाडे यांच्यात गुफ्तगू…!