धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण(secretary services) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
दोन दिवसापूर्वी मधुकरराव चव्हाण यांनी सोलापुरात(secretary services) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुनील चव्हाण हे भाजपमध्ये जाणार का याबाबत चर्चा सुरु होत्या. सुनील चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत, त्याचबरोबर ते जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदावर देखील सक्रिय आहेत.
आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. त्यासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत. त्यावेळी सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते.
मधुकरराव चव्हाण यांच्या आणि त्यांचे चिरंजीव सुनिल चव्हाण यांच्या ताब्यात असलेल्या सहकार संस्था या डबघाईला आल्या आहेत. चव्हाण पिता-पुत्राचे वर्चस्व असलेल्या तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना,सूतगिरणी, पणनसंस्था या कर्जात बुडाल्या आहेत . या संस्थावर वर्षांवर्ष या चव्हाण परिवाराचं वर्चस्व होतं पण त्या चालवण्यात चव्हाण परिवार अपयशी ठरला. याच संस्थांना वाचवण्यासाठी सुनील चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास कोणते शेअर्स करतील मालामाल?
सांगलीत फडणवीस – संंभाजी भिडे यांच्यात ‘गुफ्तगू’; संजयकाकांसाठी फिल्डिंग की…?
महायुतीला धक्क्यावर धक्के; शिंदे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा