CSK ला मोठा धक्का! संघातील प्रमुख फलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु असताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज(batsman) डेवोन कॉनव्हे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. असं म्हटलं जात होतं की तो कमबॅक करेल. मात्र तो फिट नसल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडच्या रिचर्ड ग्लीसनला संघात स्थान दिलं गेलं आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एमएस धोनीने मोठा निर्णय घेतला होता. गेली कित्येक वर्ष या संघाचं नेतृत्व केल्यानंतर अखेर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला(batsman). त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाडला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. या संघाने ६ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत. ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नईला या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएलच्या प्रेस रिलीझमध्ये लिहिलं आहे की, ‘ चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी रिचर्ड ग्लीसनला आपल्या संघात स्थान दिलं आहे. ग्लीसनने ६ टी- २० सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यादरम्यान त्याने ९ गडी बाद केले आहेत. तसेच त्याच्या एकूण टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९० टी-२० सामन्यांमध्ये १०१ गडी बाद केले आहेत. त्याला ५० लाखांच्या मुळ किंमतीत संघात स्थान देण्यात आलं आहे.’

डेवोन कॉनव्हे स्पर्धेतून बाहेर पडणं हा चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी मोठा धक्का आहे. कारण गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाला चॅम्पियन बनवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. तो या दुखापतीतून सावरु शकलेला नाही. त्यामुळे त्याला या हंगामातील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या अनुपस्थितीत रचन रविंद्र डावाची सुरुवात करताना दिसून येतोय.

हेही वाचा :

कोल्हापूर : वादग्रस्त वक्तव्यानंतर शाहू छत्रपती कुटुंब आणि मंडलिक एकत्र

कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाला होणार महाविकास आघाडीचा महामेळावा !

पुन्हा मिळवायचीय सांगली, काँग्रेसकडून ठाकरेंना ऑफर चांगली?