कोल्हापूर : महाराष्ट्र दिनाला होणार महाविकास आघाडीचा महामेळावा !

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील(virtual meeting) महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाने जय्यत तयारी केली आहे. येत्या पंधरा दिवसांत महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या तोफा या मतदारसंघात धडाडणार आहेत. गांधी मैदानात एक मे रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या तोफा धडाडणार आहेत. यासाठी 60 वक्त्यांची फळीही तयार ठेवली आहे.

उमेदवारी(virtual meeting) अर्ज भरल्यानंतरच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने नियोजन सुरू केले आहे. त्यात शेवटच्या टप्प्यात ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर पदयात्रा, सभा, बैठकांचेही आयोजन केले आहे. त्याबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. ते म्हणाले, गांधी मैदानात आघाडीतील पक्षांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. त्यात ‘आप’चे संजय सिंहदेखील सहभागी होणार आहेत.

याशिवाय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शहरात 30 ठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच-सहा प्रभागांसाठी एक असे नियोजन केले आहे. त्याचबरोबर भागातील इतर सभांसाठी 60 वक्ते तयार ठेवले आहेत. विविध ठिकाणी प्रचारासाठी गरज लागल्यास त्यांना पाठवण्यात येणार आहे. आगामी २० दिवसांत प्रभागातील वातावरण तयार करण्यासाठी महिलांच्या किमान पाच बैठका घेण्यात येणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठी तयारी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. ज्या मतदारसंघात अधिक प्रचाराची गरज आहे, अशा ठिकाणी आवश्यक त्या स्टार प्रचारांच्या सभा घेण्याचे नियोजन महाविकास आघाडीने केले आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेत्यांच्या सभा होणार आहेत. यासह प्रत्येक प्रभागात एकाचवेळी पदयात्रा काढण्याचे नियोजन केले जात आहे. त्याचा दिवस ठरवण्यात येणार असून, त्याची परवानगी घेण्यात येणार आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

अधिवास बदलला आणि बिबट्यांची दहशत वाढली

पुन्हा मिळवायचीय सांगली, काँग्रेसकडून ठाकरेंना ऑफर चांगली?

रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंसाचार; जाळपोळ अन् दगडफेक, १८ जखमी