कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

कोल्हापूर शहरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जोरदार(loyalist) धक्का बसला आहे. कोल्हापूर महापालिकेत मुश्रीफांचा गड सांभाळणारे स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांचे पती राजेश लाटकर यांनी आपली विचारधारा जपत स्वतंत्र निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवकांनी(loyalist) मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असताना राजेश लाटकर यांनी कोल्हापूरच्या पुरोगामी विचारधारेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुश्रीफांसोबत खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार देत त्यांनी काँग्रेससोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर महापालिकेत गेल्यात दोन ते तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र होती, त्यावेळी म्हणजे 2015 ते 2020 या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे 44, भाजप-ताराराणी आघाडीचे 33 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. शिवसेनेचे चारही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत होते.

राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीही महायुतीत सहभागी झाली. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेतीलही समीकरणही बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक हे मुश्रीफ यांच्या सोबत राहिले. मात्र, शहरातील काही नगरसेवकांनी मुश्रीफांच्या या भूमिकेबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत आपण महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. आपण काँग्रेस सोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत त्यांनी खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आलो आहोत. आता त्यांचा प्रचार आपण करणार नाही, अशी ठाम भूमिका राजेश लाटकर यांनी मांडली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत प्रकाश गवंडी, रमेश पुरेकर, आदिल फरास, उत्तम कोराणे, संदीप कवाळे, रेखा आवळे, रमेश पोवार, सतीश लोळगे, सुनील पाटील, परिक्षित पन्हाळकर, महेश सावंत आदी नगरसेवक आहेत. काँग्रेसकडून सचिन चव्हाण, सागर चव्हाण, संजय मोहिते, शारंगधर देशमुख्, मधुकर रामाणे, राजाराम गायकवाड, अर्जुन माने, ईश्वर परमार, सुभाष बुचडे, मोहन साले, विक्रम जरग, दुर्वास कदम, दीपा मगदूम, अनिल कदम, महेश जाधव, रियाज सुभेदार आदी माजी नगरसेवक काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात उतरले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आर. के, पोवार यांनी तर शहराची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, मुरलीधर जाधव, दीपक जाधव, अजित ठाणेकर, विजय खाड़े पाटील, किरण नकाते, सुभाष दामुगडे, अशिष ढवळे, रूपाराणी निकम, चंद्रकांत घाटगे यांनी शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेतला आहे.

हेही वाचा :

सांगलीतून लढण्यावर ठाम; संजय राऊतांवर थेट निशाणा… विशाल पाटील काय म्हणाले?

२०१४ च्या मोदी लाटेपासून १२ माजी मुख्यमंत्र्यांनी सोडला काँग्रेसचा हात

सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या