निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ‘या’ चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी पुन्हा मतदान(districts) होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून मतदानाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बैतूलमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले होते. तेव्हा तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर साहित्य घेऊन जाताना ७ मे रोजी बसला आग लागली होती होती.

७ मे रोजी बसला लागलेल्या आगीमुळे बसमधील काही ईव्हीएम(districts) मशिन जळाले होते. त्यामुळे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी १० मे रोजी फेरमतदान पार पडणार आहे. बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई येथील ४ मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होणार आहे.

बूथ २७५- राजापूर, बुथ २७६- दुदर रयत, बुथ २७९- कुंदा रयत आणि बुथ २८०- चिखलीमाळ या ठिकाणी फेरमतदान होणार आहे. या फेर मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मध्य प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत बैतूलच्या चार लोकसभा जागांवर पुन्हा मतदान होणार आहे. ७ मेच्या रात्री बैतूलमध्ये मतदान कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला आग लागली होती. या आगीत बससोबत काही ईव्हीएम मशीनही जळून खाक झाले होते आहेत. बैतूलच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाने चार मतदान केंद्रांवर फेरमतदानाची अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा :

 ऍम्ब्युलन्स खरेदी कंत्राट मिंधे सरकारच्या अंगलट

सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार

दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील