मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला

बीडमधून एक धक्कादायक बातमी(big news) समोर आली आहे. बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना काल (बुधवार, ३ एप्रिल) सायंकाळी घडली. गाडी अडवून सात ते आठ जणांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली असून या हल्ल्यात ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथील शिवसेना शिंदे(big news) गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे काल (ता. ३ एप्रिल) बीडमधून म्हाळस जवळा या आपल्या गावाकडे जात होते. बीडपासून जवळच काही अंतरावर त्यांच्या गाडीला काही जणांनी हात करुन गाडी थांबवण्याचा इशारा केला. खांडे यांनी गाडी थांबवताच त्यांच्यावर काठ्या, लोखंडी रॉडने हल्ला चढवण्यात आला.

तसेच ज्ञानेश्वर खांडे यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यामध्ये खांडे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, कल्याणमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासह तेलंगणामध्ये घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अविनाश धनाजी शिंदे आणि सॅमसंग डॅनियल अशी चोट्यांची नावे असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या दोघांविरोधात महाराष्ट्रसह इतर राज्यात विविध पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (04-04-2024)

नवनीत राणांची उमेदवारी धोक्यात?, सुप्रीम कोर्ट जात वैधता प्रमाणपत्रावर देणार निकाल

हातकणंगलेत धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत यांचा दावा