राज्यातील पेट्रोलच्या(fuel prices) किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात.
जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती(fuel prices) वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 3 जानेवारी रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.68 रुपये प्रतिलिटर आहे. मागच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.89 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.21 टक्क्यांनी कमी झाली आहे.
तर, डिझेल 91.21 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. काल 2 जानेवारीरोजी देखील महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही.
मागील 5 दिवसांचा विचार केल्यास महाराष्ट्रात 29 डिसेंबर 2024 रोजी डिझेल 91.42 प्रति लिटर होते. 30 डिसेंबररोजी 91.29, 31 डिसेंबररोजी 91.21 तर नववर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी 91.21 आणि आजदेखील भावात कोणतेच बदल झाले नाही. आजही डिझेल 91.21 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
मेट्रो सिटीमधील इंधनदर
दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.77 तर डिझेल 87.67
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 104.68 तर डिझेल 91.21
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 104.95 तर डिझेल 91.76
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.75 तर डिझेल 92.34
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 99.84 तर डिझेल 85.93
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेत बदल! काही महिलांना पुढील महिन्यापासून मिळणार नाही लाभ
नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!
“…सोडून जाताना लाज वाटली नाही का?”; जितेंद्र आव्हाड ‘त्या’ नेत्यावर भडकले तरी का?